लातूर: आ. बसवराज पाटील मुरुमकर यांनी औसा मतदारसंघाच्या विकासाचा संकल्प करून तो पूर्णत्वास नेण्याचा विडा उचलला आहे. त्या दिशेने त्यांची पावले पडत आहेत .यामुळे शहरासह संपूर्ण मतदारसंघात वेगवान विकासकामे सुरू आहेत. विशेष म्हणजे आ .पाटील यांच्या या प्रयत्नांना भाजपाचीही साथ मिळत असल्याचे पंचायत समिती सभापतींच्या अविश्वास ठरावावेळी दिसून आले .
केंद्रात आणि राज्यात आज भाजपाची सत्ता आहे. यामुळे साहजिकच देशभरात काँग्रेससह इतर पक्षातील नेत्यांचा भाजपाकडे ओढा आहे .अनेक नेते भाजपात प्रवेश करीत आहेत .असे असताना औशात मात्र भाजपाच्या मंडळींचा काँग्रेसकडे ओढा असल्याचे दिसून आले .पंचायत समितीची निवडणूक झाल्यानंतर आ. बसवराज पाटील मुरुमकर यांनी संजय कदम यांची सभापतीपदी निवड केली .त्याच वेळी कदम यांना सव्वा वर्षाचा कार्यकाल निश्चित करून देण्यात आला होता .त्यानुसार सव्वा वर्षाने कदम यांनी पद सोडणे अपेक्षित होते . परंतु कदम यांनी त्याला नकार दिला. आपला माणूस शब्द पाळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर आ . बसवराज पाटील यांच्या विश्वासातील इतर सदस्यांनी सभापती संजय कदम यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणला .पंचायत समितीमध्ये काँग्रेसचे 10, भाजपाचे 5, राष्ट्रवादी-मनसे यांचा प्रत्येकी एक व इतर एक असे पक्षीय बलाबल आहे. ठरावाच्यावेळी भाजपाच्या सदस्यांनी काँग्रेसला साथ देऊन कदम यांना पायउतार करण्यास हातभार लावला नव्हे आ. बसवराज पाटील यांच्या नेतृत्वाला साथ दिली .आ .बसवराज पाटील हे मुळात उस्मानाबाद जिल्ह्यातील मुरूमाचे रहिवासी असले तरी लातूर व उस्मानाबाद या दोन्ही जिल्ह्यात ते काम करतात. मुरूमचे रहिवासी असतानाही त्यांनी औसा शहर व मतदारसंघाचा कायापालट केला .पाटील यांच्याच पुढाकाराने किल्लारी साखर कारखाना कर्जमुक्त झाला . औसा शहराला हरित करण्याचे काम आ.पाटील यांनी केले. एवढेच नव्हे तर औसा शहराला स्वच्छतेच्या बाबतीत पुरस्कारही मिळाला .नगर परिषद व इतर शासकीय कार्यालयांच्या इमारती आ .पाटील यांच्या कार्यकाळात आणि प्रयत्नांनी उभ्या राहिल्या .त्यामुळे बसवराज पाटील यांचे औसा मतदारसंघावर वर्चस्व प्रस्थापित झाले .अशा स्थितीत संजय कदम यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर झाला आणि भाजपाने त्यांना साथ दिली .यासंदर्भात आमदार बसवराज पाटील मुरुमकर यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी संपर्क साधला पण ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा हा आमचा नंबर
No comments:
Post a Comment