३ सप्टेबरची डेडलाईन, मराठा क्रांतीच्या बैठकीत निर्णय
लातूर। प्रतिनिधी
मराठा विद्यार्थ्यांच्या वस्तीगृहाचा प्रश्न त्वरीत मार्गी न लावल्यास येत्या ३ सप्टेंबरपासून जिल्ह्यातील प्रत्येक महाविद्यालयातील विद्यार्थी वस्तीगृह मिळेपर्यंत शासकीय कार्यालयासमोर उपोषण करतील, असा निर्णय शुक्रवारी मराठा क्रांती भवनात झालेल्या जिल्हास्तरीय बैठकीत घेण्यात आला.
मराठा समाजाची आर्थिक स्थिती हालखिची असल्याने त्यांना शिक्षण घेण्यासाठी अडचणी येत आहेत. अनेकांकडे खोलीभाड्याला व बस पासलाही पैसे नाहीत. त्यांची ही अबाळ दूर करण्यासाठी वस्तीगृहाची मागणी मराठा क्रांतीच्या वतीने करण्यात आली होती. ५८ मोर्चे काढुनही ती मार्गी लागली नाही. ठोक मोर्चानंतर शासनाने याबाबत हालचाली सुरू केल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. १५ ऑगस्टपर्यँत यावर प्रत्यक्ष अमलबजावणी अपेक्षीत होती पंरतु ती झाली नाही त्यामुळे तरुणांत सरकारप्रती असंतोष पसरल्याचे सांगण्यात आले. सर्वसुविधांनी सुज्ज असलेले वस्तीगृह शासनाने सुरू करावे यासाठी साठी तीन सप्टेंबरही डेडलाईन देत असून निर्णय न झाल्यास जिल्ह्यातील सर्व मराठा विद्यार्थी व विद्यार्थिनी शासकीय कार्यालयासमोर साखळी उपोषण करतील असा इशारा या बैठकीतून देण्यात आला.
मराठा समाजाच्या मागण्यासंदर्भात अजुनही शासन गंभीर नसल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त करीत मराठा युवकांवर खोटे गुन्हे दाखल करुन त्याचे करीअर संपवण्याचा कट शासनाने आखल्याचा आरोप समाजबांधवांनी केला. आंदोलना दरम्यान नोंदवलेले हे गुन्हे तत्काळ मागे घ्यावेत यासाठी सोमवारी (दि २० ऑगस्ट) जिल्हा पोलिस अधिक्षकांना निवेदन देण्याचे या बैठकीत ठऱले. बैठकीस जिल्हाभरातील समाजबांधव व मराठा संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येत उपस्थित होते.
अटलजिंना श्रध्दांजली
देशाचे माजी पंतप्रधान लोकनेते अटलबिहारी वाजपेयी यांना मराठा क्रांतीच्या वतीने भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. निस्वार्थी भावनेने राष्ट्रसेवा केलेल्या अटलजींचे जीवन हा अखंड स्फुर्तीचा झरा असल्याची भावना यावेळी समाजबांधवानी व्यक्त केला
संविधान दहनाचा निषेध
दिल्ली येथे संविधान दहन केलेल्या घटनेच्या यावेळी निषेध करण्यात आला. यात गुंतलेल्या देशद्रोह्यांना कठोर शासन कऱण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:
Post a Comment