पीककर्जासाठी आडगावच्या शेतकऱ्यांचे उपोषण

Wednesday, August 8, 2018



हिंगोली / प्रतिनिधी 
शहरातील गंगानगर भागात असलेल्या बॅंक ऑफ इंडियाच्या शाखेने पीककर्ज देण्यास नकार दिल्यामुळे आडगाव येथील शेतकऱ्यांनी 6 ऑगस्ट रोजी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. 

          पीककर्ज मिळावे याकरीता मागील दोन महिन्यांपासून गंगानगरातील बॅंक ऑफ इंडियाच्या शाखेत शेतकरी येरझारा करीत आहेत. परंतु, बॅंकेकडून पीककर्ज देण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. श्यामराव जाधव, शेषराव जाधव, उत्तम हानवते, केशव जाधव, भागवत पंडीत, शांताबाई जाधव, धमानंद पंडीत, माधव जाधव, तुळशीराम मुटकुळे, रूख्माबाई मुटकुळे, देविदास मुटकुळे, शिवाजी मुटकुळे, लक्ष्मण हनवते, कैलास गिरी, सुनीता गिरी, भारत हानवते, लक्ष्मण हानवते, संभाजी हानवते, देवराव हानवते, चंद्रकला गिरी, सीताराम कांबळे, अर्जून ढगे, गजानन मुटकुळे, दत्ता मुटकुळे, विश्वनाथ जाधव, उमेश जाधव, मणकर्णाबाई जाधव आदी शेतकरी उपोषणात सहभागी झाले आहेत. 

No comments:

Post a Comment