हम फिट तो इंडिया फिट लातूर जिल्ह्यात होणार 54 ओपन जिम

Wednesday, August 8, 2018


लातूर /प्रतिनिधी: देशातील नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी केंद्र व राज्य सरकार प्रयत्नशील आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिम अर्थात व्यायामशाळेसाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध केला जात आहे. हम फिट तो इंडिया फिट या घोषवाक्याप्रमाणे लातूर जिल्ह्यातील नागरिक तंदुरुस्त राहावे यासाठी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांचा पुढाकार आणि पाठपुराव्यामुळे लातूर जिल्ह्यासाठी चोपन्न ओपन जिम मंजूर झाल्या असून अनेक ठिकाणी या ओपन जिमची उभारणी वेगाने सुरू आहे.

पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पुढाकारातून जिल्ह्यात इंद्रप्रस्थ जलभूमी अभियान राबविण्यात आले .या अभियानादरम्यान पालकमंत्र्यांनी ही संकल्पना मांडली होती. त्यासाठी त्यांनी पाठपुरावाही केला आणि मोठ्या प्रमाणात निधी लातूर जिल्ह्यासाठी खेचून आणला. या निधीतूनच जिल्ह्यात विविध ठिकाणी ओपन जिमची उभारणी होत आहे.


जिल्ह्यासाठी एकूण 54 ओपन जिम मंजूर झाल्या असून त्यापैकी 1३ जिम लातूर तालुक्यात होणार आहेत. निलंगा तालुक्यात 14, उदगीर तालुक्यात ७, अहमदपूर तालुक्यात 7 तर औसा ,चाकूर आणि व शिरूरअनंतपाळ तालुक्यात अनुक्रमे नऊ ,एक व 3 जिमची उभारणी होणार आहे .लातूर शहरातील प्रभाग क्रमांक 6 ,प्रभाग 8 ,प्रभाग प्रभाग 11, प्रभाग 15 ,प्रभाग 17, प्रभाग 18 मध्ये महापालिकेच्या जागेत या जिम होणार आहेत .याशिवाय मयूरबन सोसायटीमध्ये प्रयागबाई पाटील महाविद्यालयाच्या बाजूस असणाऱ्या ग्रीन बेल्ट मध्ये , साईधाम येथील व गुणगुणे नगरमधील सार्वजनिक जागेत तसेच सावित्रीबाई फुले उद्यान व डालडा फॅक्टरी कंपाउंड मध्ये असणाऱ्या ग्रीन बेल्ट मध्ये ओपन जिम साकारणार आहे .लातूर तालुक्यातील गांजूर - ताडकी या ग्रुप ग्रामपंचायत कार्यालयातही जिम होणार आहे.

निलंगा शहरातील विश्वंभर नगर ,रामकृष्ण नगर, लोंढे नगरातील पूर्व बाजू येथील खुल्या जागेत जिम होणार आहेत. यासोबतच शिवाजी विद्यालय जवळ म्हाडा येथे, पांचाळ कॉलनीतील विश्वकर्मा मंदिराजवळ , दत्तनगर परिसरातील जिल्हा परिषद शाळेच्या बाजूस तसेच हाडगा रस्त्यावर शिवाजीनगर व सरस्वती कॉलनीत नगरपालिकेच्या खुल्या जागेत जिम होणार आहे. निलंगा तालुक्यातील कासार बालकुंदा, तांबाळा , बोटकुळा- आंबेवाडी ,उस्तुरी ,वडगाव व औराद शहाजानी येथील ग्रामपंचायत कार्यालयात ओपन जिम उभ्या राहणार आहेत .

उदगीर शहरातील नेताजी सुभाषचंद्र बोस नगरमध्ये सर्वे नंबर 14 प्रभाग क्रमांक चार मधील खुल्या जागेत, प्रभाग क्रमांक 11 मध्ये उड्डाणपुलाच्या दक्षिण बाजूस सर्वे नंबर 344 मध्ये जिम होणार आहे .उदगीर शहरातील प्रभाग क्रमांक 11 मध्ये मुक्कावार नगरातील खुली जागा ,प्रभाग क्रमांक 16 मध्ये शाहू सोसायटीच्या दक्षिण बाजूस सर्वे नंबर 1 मध्ये तर प्रभाग क्रमांक 18 मध्ये तिरुपती सोसायटी सर्वे नंबर 307 मध्ये ओपन जिम उभारणार आहे .उदगीर शहरातील प्रभाग क्रमांक 13 मध्ये इंदिरा गृहनिर्माण सोसायटी तसेच याच प्रभागातील हावगीस्वामीच्या क्रीडांगणावर जिम उभी राहत आहे .

अहमदपूर शहरात प्रभाग क्रमांक सात मध्ये काळेगाव रस्त्यावर इंदिरानगर भागात यशवंत शाळेसमोर आणि प्रभाग क्रमांक तीनमध्ये न्यू विद्या नगर येथे जिम होणार आहे .शहरातील प्रभाग चारमध्ये शिवाजीनगर व प्रभाग 11 मध्ये बँक कॉलनी येथे जिम सुरू होईल .प्रभाग क्रमांक दोनमध्ये अभिनव गृह निर्माण सोसायटी येथे तसेच तालुक्यात किनगाव ,काजळ हिप्परगा येथील ग्रामपंचायत कार्यालयात जिम सुरू केली जाणार आहे .

औसा शहरातील माळी गल्ली, राम मंदिर ,धनगर गल्ली ,जमाल नगर ,अन्नपूर्णा नगर, नगरपालिका उद्यान, किल्ला परिसर येथील खुल्या जागेत तर तालुक्यातील आशिव व बुधोडा येथील ग्रामपंचायत कार्यालयात जिम साकारणार आहे .चाकूर तालुक्यातील अलगरवाडी ग्रामपंचायत तसेच शिरूर अनंतपाळ तालुक्यात साकोळ, थेरगाव ,तळेगाव बोरी येथील ग्रामपंचायतीमध्ये ओपन जिम उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे .

जिल्ह्यातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे ,त्यांना कुठलेही आजार होऊ नयेत यासाठी पालकमंत्र्यांनी प्रयत्न चालविले आहेत . याचाच एक भाग म्हणून या ओपन जिम उभारल्या जात आहेत .आगामी काही दिवसात यांची उभारणी पूर्ण होणार असून जिल्ह्यातील युवक व नागरिकांना येथे व्यायाम करता येणार आहे. यामुळे विशेषतः तरुणाईकडून पालकमंत्र्यांचे आभार मानले जात आहेत.

मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment