सर्व सामान्यांच्या समया सोडवणे हाच माझा अजेंडा- पोलिस अधिक्षक माने

Thursday, August 2, 2018



लातूर / प्रतिनिधी  
सर्वसामान्य माणसांच्या समस्या सोडवणे हाच माझ्या कामाचा प्रमुख अजेंडा आहे असे मत नुतन पोलीस अधिक्षक राजेंद्र माने यांनी व्यक्त केले. पोलीस अधिक्षक शिवाजी राठोड यांची ठाण्यात तर नवी मुंबईचे पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांची लातूर येथे पोलीस अधिक्षक म्हणून बदली झाली आहे. गुरूवारी माने यांनी पदभार स्विकारला. राठोड यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी माने बोलत होते. 

     
    उस्मानाबाद जिल्ह्यात तीन वर्ष अप्पर पोलिस अधिक्षक म्हणून सेवा बजावणाऱ्या राजेंद्र माने यांनी लातूर आपल्यासाठी नवे नसल्याचे म्हटले आहे. लातूर जिल्हा प्रगतीपथावर असणारा जिल्हा आहे. शैक्षणिक दृष्टया या ठिकाणी विद्यार्थी संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. शहरीकरण वेगाने होत आहे. त्या अनुषंगाने विविध प्रश्न निर्माण होत असतात. हे प्रश्न सोडवण्यावर आमचा भर राहील असे पोलिस अधिक्षक राजेंद्र माने यावेळी म्हणाले. 

   लातूर शहरात दुचाकी चोरीच्या घटनात लक्षणीय वाढ होत आहे. राज्यातील अनेक शहरात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढत आहे. पण हा प्रश्न असा सोडवता येईल याकडे आपण गांभीर्याने पाहू असे बोलून माने म्हणाले, सामान्यांतील सामान्य माणसांना पोलीस ठाण्यात सहजपणे येता आले पाहिजे. सहजपणे आपले प्रश्न, समस्या, पोलिसांसमोर मांडता आले पाहिजे, सामान्य माणसांच्या समस्या सोडविणे हाच माझ्या कामाचा अजेंडा पुर्वीपासून आहे. तोच अजेंडा मी लातूरमध्येही जपेत अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. 
   
 आपल्या दोन वर्षाच्या कार्यकाळात लातूरकरांनी खूप प्रेम दिले. येथील असंख्य आठवणी आपल्या कायम स्मरणात राहतील. गायन ही माझी आवडही या ठिकाणी जपता आली. सामाजिक उपक्रमातून लोकांशी संवाद साधता आला याचे समाधान असल्याचे मत मावळते पोलीस अधिक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमास जिल्ह्यातील पोलीस अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment