आयुक्त 'दिवेगावकर' लावत आहेत दिव्या मागे 'दिवे'

Wednesday, August 1, 2018



लातूर मनपा झाली डिजिटल कर भरण्यासाठी पीओएस  यंत्रणा उपलब्ध 

लातूर/ प्रतिनिधी:  आर्थिक व्यवहार  रोखीने करण्याऐवजी ते ऑनलाईन व्हावेत  यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आग्रही आहेत. त्याच अनुषंगाने लातूर महापालिकेने आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांच्या पुढाकारातुन कर भरण्यासाठी पीओएस यंत्रणा कार्यान्वित केली असून यामुळे लातूर पालिका आता टेक्नोसॅव्ही झाली आहे.आयुक्त 'दिवेगावकर' लावत आहेत दिव्या मागे 'दिवे' ऑनलाईन पद्धतीने कर भरण्याचा पहिला मान अमोल गोवंडे यांना मिळाला .

 नोटबंदीनंतर आर्थिक व्यवहार रोखीने न करता त्यासाठी विविध पर्याय वापरले जावेत असा आग्रह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता. देशातील अनेक संस्था व नागरिकांनी त्याला उस्फुर्त प्रतिसाद दिला .लातूरातही डिजिटल माध्यमातून व्यवहारांची संख्या वाढली. यामुळे महापालिकेनेही अशी यंत्रणा सुरू करावी अशी मागणी केली जात होती. या मागणीला प्रतिसाद देत आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांनी महापालिकेत  मंगळवारपासून पीओएस यंत्रणा कार्यान्वित केली आहे.

 त्यामुळे शहरातील नागरिकांना डेबिट कार्ड ,क्रेडिट कार्ड स्वाईप करून आपला कर भरता येणार आहे. ही यंत्रणा कार्यांन्वित झाल्यानंतर अमोल गोवंडे यांनी आपला कर ऑनलाईन भरुन पहिला डिजिटल व्यवहार पार पाडला ऑनलाईन पद्धतीने  भ्रष्टाचाराला आळा बसणार असून आर्थिक व्यवहार डिजिटल झाल्यामुळे महापालिकेच्या आर्थिक कारभाराला  शिस्त लागणार आहे .आगामी काही दिवसात महापालिकेतील सर्वच व्यवहार डिजिटल करण्याच्या दिशेने पालिकेने हे पाऊल उचलले असून सर्व स्तरातील नागरिकांकडून त्याचे स्वागत केले जात आहे.

आयुक्त म्हणून रुजु झाल्यापासुन दिवेगावकर यांनी  पालिकेच्या कारभाराला शिस्त लावण्यास प्रारंभ केला आहे त्यामुळे आर्थिक शिस्त लावण्यासाठी त्यांनी उचललेले हे पाऊल महत्वाचे ठरणार आहे .
गेल्या आठवड्यात ऑनलाइन बांधकाम परवाना सुरू झाला आहे या मुळे जनतेला आडवा आणि पैसे जिरवा याला पायबंद बसणार आहे आणि आर्थिक व्यवहार पारदर्शक व गतीने होणार आहेत हे सुध्दा लातूरकरांसाठी अच्छे दिन ची सुरवात आहे 

चांगले अधिकारी येणे त्यांना काम करुदेणे या बद्दल आम्ही पालकमंत्री ना संभाजीराव पाटील निलंगेकर ,जिल्हाधिकारी जि श्रीकांत ,व मुख्यमंत्र्यांचे सचिव अभिमन्यू पवार यांना अभिनंदन देत असताना आयुक्त दिवेगावकर हे खऱ्या अर्थाने विकासाचे अच्छे दिनचे दिवे लावत आहेत याला सर्वांची साथ आहे म्हणूनच वाऱ्या वादळाशिवाय दिवे लागत आहेत 

No comments:

Post a Comment