नवी दिल्ली : 'सब का साथ सब का विकास', हे आमचं ब्रीद असून आरक्षण जसं आज आहे, तसंच यापुढेही राहील, त्याला कुठलाही धक्का लागणार नाही, आर्थिक निकषांवर आरक्षण देण्याच्या सूचनाही काही जणांकडून येत आहेत. ही चर्चा सुरू असतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरक्षणाबाबतची आपल्या सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. असं पंतप्रधान मोदींनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत नमूद केलं आहे.
सध्या महाराष्ट्रात मराठा समाज, राजस्थानात गुर्जर, हरियाणात जाट आणि गुजरातमध्ये पाटीदार पटेल आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झाले आहेत. राज्य किंवा केंद्र सरकारकडून कुठलाच ठोस निर्णय घेतला जात नसल्यानं त्यांच्यातील अस्वस्थता वाढतेय, रोष वाढतोय. त्यातच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आरक्षणाबद्दलची भूमिका वेगळी आहे. त्यामुळे भाजपा सरकारही जातीवर आधारित आरक्षण न देता, आर्थिक निकषांवर आरक्षण देण्याचा विचार करतंय, असं अनेकदा बोललं जातं. परंतु, अशा वावड्या उठवणं हा विरोधकांचा डाव असल्याचं मोदी म्हणाले.
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:
Post a Comment