मणिशंकर अय्यर यांचं मोदींवर वादग्रस्त वक्तव्य

Sunday, August 12, 2018

मुस्लिमांना गृहीत धरणारे मोदी पंतप्रधान होतील असं वाटलंच नाही 
नवी दिल्ली: वादग्रस्त वक्तव्य करण्यासाठी प्रसिद्ध असलेले काँग्रेसचे नेते मणिशंकर अय्यर यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान करून राजकीय वावटळ उठविण्याचा प्रयत्न केला आहे .पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत हे वक्तव्य करून त्यांनी नव्या चर्चेला तोंड फोडलं आहे .'मुसलमानांची श्वानाशी तुलना करून त्यांच्याविषयी घृणास्पद वक्तव्य करणारा व्यक्ती देशाचा पंतप्रधान होईल असं मला २०१४ पूर्वी वाटलं नव्हतं', असं वक्तव्य अय्यर यांनी केलं आहे. 

.नवी दिल्लीत इंडिया इंटरनॅशनल सेंटरमध्ये असहिष्णुता या विषयावर आयोजित कार्यक्रमात अय्यर यांनी हे वक्तव्य केलय  २००२ मध्ये असंख्य मुसलमानांना जीव गमवावा लागला. त्याबद्दल तुम्हाला दु:ख वाटतं का? असा प्रश्न मोदींना विचारण्यात आला होता. त्यावर कुत्र्याचं पिल्लू गाडीखाली आलं तर दु:ख होतच अशी प्रतिक्रिया मोदींनी दिली होती', असं अय्यर यांनी निदर्शनास आणून दिलं.  

या वक्तव्यामुळे भाजप कार्यकर्ते पुन्हा एकदा त्यांच्यावर तुटून पडण्याची शक्यता आहे .यापूर्वीही अय्यर यांनी अशी वक्तव्य करून भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नव्या वादाला तोंड फोडले होते. अय्यर यांच्या या विधानानंतर पुन्हा एकदा देशभर वादविवाद आणि चर्चासत्रे झाडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment