2019 बाबत मोदींची मोठी भविष्यवाणी

Sunday, August 12, 2018




२०१९ मध्ये भाजप रेकॉर्डब्रेक करणार

नवी दिल्ली -  पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत  भाजपा एक पाऊल पुढेच असेल .2014 च्या निवडणुकीपेक्षा अधिक जागा जिंकून आम्ही पुढील वाटचाल करू , विजयी होऊ, अशी भविष्यवाणी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे . जनतेला भक्कम आणि निर्णयक्षम सरकार हवे आहे. जे चांगली कामगिरी करू शकेल, असेही त्यांनी सांगितले

एका  मुलाखतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी पुढील सार्वत्रिक निवडणुकीत आपल्या पक्षाच्या विजयाबाबत विश्वास व्यक्त केला आहे. तसेच मॉब लिंचिंगबाबत चिंता व्यक्त केली आहे. प्रामाणिकपणे उद्योगधंदे चालवणाऱ्यांना संरक्षण देण्याचे आणि भ्रष्टाचाऱ्यांना शिक्षा देण्याचे आश्वासन मोदींनी दिले. सध्या आसाममध्ये पेटलेल्या नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स पूर्ण करण्याचे काम करणार असल्याचे सूतोवाचही त्यांनी केले. 

या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "असमान आणि हताश झालेल्या परस्परविरोधी पक्षांच्या समुह म्हणजे महाआघाडी नव्हे तर राजकीय उतावळेपणा आहे. पुढच्या निवडणुकीत आपल्या कामाचा मंच विकास, वेगवान विकास आणि सर्वांचा विकास हा असेल. तसेच आमच्या पक्षाला गेल्या निवडणुकीपेक्षा निश्चितपणे अधिका जागा मिळतील. आम्ही याआधीचा विक्रम मोडीत काढू, असा मला विश्वास आहे." 

यावेळी मोदींनी एनआरसीच्या मुद्द्यावरून काँग्रेसवर टीकास्र सोडले. आसाममधील एनआरसीच्या मुद्द्यावरून मतांचे राजकारण सुरू आहे. 1972 आणि 1982 मध्ये काँग्रेसचे सरकार असताना एनआरसीची अंमलबजावणी टाळले गेले होते." असेही ते म्हणाले.  
भाजपा सरकार आल्यापासून रोजगार वाढत आहेत गतवर्षी संघटित क्षेत्रात ७० लाख रोजगार वाढले .१२ कोटी नव उद्योजकांना मुद्राच्या माध्यमातून कर्ज दिले पर्यटनातून रोजगार निर्मिती झाली याकडेही मोदींनी लक्ष वेधले .भाजप सरकार सत्तेवर आल्यापासून भ्रष्टाचार कमी झाला आहे .विकास गतिमान झाला असून तो आणखी गतिमान करायचा आहे. भ्रष्टाचार्‍यांना संधी मिळू नये यासाठी काम केले जात आहे. जागतिक पातळीवर विविध देशांशी संबंध सुधारले आहेत. शेजारील देशांकडून होणारी घुसखोरी कमी झाली आहे. देशाच्या संरक्षणाबाबत कुठलीही तडजोड केली जात नाही .प्रशासनात तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर केला जात आहे ,त्यामुळे प्रशासन गतिमान झाले असून सामान्य नागरिकांना याचा फायदा होऊ लागला आहे .या सर्व बाबींचा विचार करता पुढील वर्षी होणार्‍या निवडणुकीत भाजपा  अधिक जागा घेऊन विजयी होईल असा विश्वास पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला.


No comments:

Post a Comment