राइट, लेफ्ट, सेंटर सगळीकडं चाललंय काय? सर्वोच्च न्यायालयाचा उद्विग्न सवाल

Tuesday, August 7, 2018

नवी दिल्ली: 
देशातील विविध राज्यात घडणाऱ्या बलात्काराच्या घटनांवरून सर्वोच्च न्यायालयही संतप्त झाले आहे सरकारच्या संमतीनेच हे सारे चाले आहे अशी परिस्थिती निर्माण झाली असून ही गंभीर बाब आहे अशी टिप्पणी करून राइट, लेफ्ट, सेंटर सगळीकडं हेच चित्र आहे. हे चाललंय काय?,' असा उद्विग्न सवाल सर्वोच्च न्यायालयानं आज केला. 

नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्यूरोचा हवाला देत न्यायालयानं देशातील महिला अत्याचाराबाबत चिंता व्यक्त केली. 'देशात दर सहा तासाला एका मुलीवर बलात्कार होतो. वर्षाला अशा ३८ हजारांहून जास्त घटना घडतात. सर्वाधिक बलात्कार मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात होतात, असंही न्यायालयानं निदर्शनास आणलं.

बिहारमधील मुझफ्फरपूर व उत्तर प्रदेशातील देवरिया इथं स्वयंसेवी संस्थांतर्फे चालवणाऱ्या जाणाऱ्या बालिका आश्रमात अल्पवयीन मुलींवर झालेल्या बलात्काराच्या प्रकरणावर सुनावणी करताना खंडपीठानं हे मत व्यक्त केलं. बिहारमधील नितीश कुमार सरकारला न्यायालयानं यावेळी अत्यंत कठोर शब्दांत फटकारलं. '२००४ पासून राज्य सरकार वेगवेगळ्या बालिका आश्रमांना निधी देतंय. पण तिथं नेमकं काय चाललंय याची सरकारला अजिबात माहिती नाही. त्याबद्दल चौकशी करण्याची साधी तसदीही सरकारनं घेतलेली नाही. सरकारच्या संमतीनंच जणू हे सगळं चाललंय अशी परिस्थिती आहे. ही गंभीर बाब आहे,' अशी गंभीर टिप्पणी न्यायालयानं केली.

No comments:

Post a Comment