स्टार्टअप क्षेत्रात भारत जगात दुसऱ्या स्थानावर : पंतप्रधान मोदीं

Saturday, August 11, 2018

मुंबई :  - भारतातील आयआयटी मुलांचा जगभरात डंका असून त्यामध्ये मुंबईच्या आयआयटीमधील विद्यार्थ्यांना प्रभाव आहे. त्यामुळेच स्टार्टअप क्षेत्रात भारत जगात दुसऱ्या स्थानावर असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे. 

पंतप्रधान मोदी आज मुंबई दौऱ्यावर असून सकाळी भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मुंबईच्या 56 व्या दीक्षान्त समारंभात बोलताना मोदींनी मुंबईतील आयआयटी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.तसेच मुंबई आयआयटीच्या विकासासाठी 1 हजार कोटींचा निधी देणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. . प्रकाश जावडेकर, राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. 

या आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी जगभरात नावलौकीक मिळवला असल्याचे कौतुकोदगारपंतप्रधान नरेंद्र मोदींनी काढले. आयआयटीला आता एक हजार कोटी रूपयांचे अनुदान मिळणार असून यातून अजून जास्त पायाभूत सुविधा विद्यार्थ्यांना मिळणार असल्याची माहिती त्यांनी दिली. आयआयटी हा जगभरातील एक अतिशय उज्ज्वल ब्रँड बनला असल्याचे ते म्हणाले. माहिती तंत्रज्ञानामुळे देशात नवीन क्रांती झाली आहे. यात स्टार्टपच्या युगात आयआयटीच्या विद्यार्थ्यांचे सर्वात मोलाचे स्थान असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.जगभरातील विविध स्टार्टप्समध्ये आयआयटीच्या विद्यार्थ्यांचा वाटा असल्याबद्दल त्यांनी कौतुक व्यक्त केले

मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment