तहसील व पंचायत समिती साठीही दीड कोटीचा निधी पालकमंत्र्यांचा पाठपुरावा
लातूर/ प्रतिनिधी: पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पाठपुराव्यामुळे निलंगा येथील उपजिल्हा रुग्णालयासाठी आठ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यासह निलंगा येथील तहसील कार्यालय व पंचायत समितीच्या नवीन इमारतीमध्ये फर्निचर व इतर कामांसाठी दीड कोटी रुपयांचा निधी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंजूर केला आहे.
जुलै महिन्यात सादर झालेल्या पुरवणी अर्थसंकल्पात या निधीची तरतूद करण्यात आली आहे .यासंदर्भात अर्थमंत्र्यांनी पालकमंत्र्यांना पत्र दिले असून आपण एक कार्यक्षम मंत्री आहात असा गौरवपूर्ण उल्लेख त्यात केला आहे .पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे हा निधी मंजूर झाला असून लवकरच या दोन्ही इमारतींचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते संपन्न होणार आहे होणार आहे हा निधी मंजूर करुन आणल्याबद्दल तालुक्यातील नागरिकांकडुन पालकमंत्री संभाजीराव पाटील यांचे आभार मानले जात आहेत .
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:
Post a Comment