आ. भिसे यांच्याविषयी मतदारसंघात सहानुभूतीची लाट

Saturday, August 11, 2018

लातूर/ प्रतिनिधी :दिनांक 9 ऑगस्ट रोजी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आयोजित आंदोलनादरम्यान लातूर ग्रामीण मतदारसंघाचे आमदार त्र्यंबक नाना भिसे यांना धक्काबुक्की करण्यात आली. त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. या घटनेनंतर मतदारसंघात आ. भिसे यांच्या विषयी सहानुभूतीची लाट पसरली असून भिसे यांची प्रतिमा मलिन करण्याचा हा डाव असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत.


मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आरक्षण व इतर मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये सहभागी होण्यासाठी गेल्यानंतर आ. भिसे यांना धक्काबुक्की करून त्यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली. आ. त्र्यंबक नाना भिसे हे एक सज्जन, प्रामाणिक व मितभाषी व्यक्ती म्हणून परिचित आहेत. प्रत्येक व्यक्तीचे काम करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. आजपर्यंत त्यांनी कोणाचेही वाईट केलेले नाही. एकमेकात भांडणे लावणे ,गटबाजी करणे हा त्यांचा स्वभाव नाही. कोणासोबतही ते सूडभावनेतून वागत नाहीत . जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती आणि गटनेते असताना कुठल्याही कामासाठी त्यांनी कोणाकडूनही काही घेतले नाही .आतापर्यंत ॲड . भिसे सकारात्मक व विकासाचे राजकारण करत आहेत . जाहीर कार्यक्रमात त्यांच्या समोरच इतर नेत्यांचा भावी आमदार असा उल्लेख झाला तरीही त्यांनी साधी नाराजीही व्यक्त केली नाही .आ भिसे यांचे वडील भाऊ म्हणून सर्वत्र ओळखले जायचे .त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आ.त्र्यंबक नाना भिसे यांची राजकीय वाटचाल सुरू आहे. परवा घडलेला धक्काबुक्कीचा प्रकार निंदनीय आहे .मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने काही दिवसांपूर्वी आमदार यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आले .त्यावेळी भिसे स्वतः त्यात सहभागी झाले .

स्वतःच्या घरासमोर होणार्‍या आंदोलनात सहभागी झालेले ते एकमेव आमदार आहेत. असे असतानाही त्यांची राजकीय वाटचाल काही नेत्यांना पहावत नाही. त्यामुळे हा प्रकार घडला. सज्जन व्यक्तीला संपवण्याचे षडयंत्र यातून उघडे पडले. यामुळेच सहानुभूतीची लाट पसरली आहे .मागील तीन दिवसात आमदार भिसे यांची विचारपूस करण्यासाठी विविध पक्षांचे नेते ,पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची रीघ लागली आहे. राज्यभरातून अनेक नेते, पदाधिकारी भ्रमणध्वनीवरून त्यांची चौकशी करत आहेत.


राष्ट्रवादी काँग्रेसचे लातूर ग्रामीण विधानसभा अध्यक्ष संतोष शिंदे यांनीही आमदार भिसे यांची भेट घेऊन चौकशी केली. नानांची प्रतिमा मलिन करण्याचे हे षडयंत्र असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. सर्व जाती धर्माचे लोक आमदार भिसे यांच्या पाठीशी आहेत. नानांची राजकीय कारकीर्द संपवण्याचा हा डाव आहे .आमदार भिसे यांनी तीर्थक्षेत्र विकास निधी अंतर्गत रेणापूर, पांढरी येथील देवस्थानांना निधी मिळवून दिला .बामणी येथील पुलासाठी निधी मिळवला. सामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी वारंवार सभागृहात आवाज उठवला .असे असतानाही घडलेला प्रकार निंदनीय आहे असे मतही संतोष शिंदे यांनी व्यक्त केले

मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment