हिंगोली / प्रतिनिधी
आगामी काळात होवू घातलेल्या लोकसभा निवडणुकीबाबत भाजपाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यासह विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी 11 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजता येथील रामाकृष्णा हॉटेल येथे जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर यांची उपस्थिती राहणार आहे.
या बैठकीत भाजपा पक्षाची बांधणी, संघटनात्मक चर्चा तसेच आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीबाबत सविस्तर चर्चा होणार आहे. यासाठी बुथनिहाय नियोजन या बैठकीत चर्चिले जाणार आहे. गेल्या चार वर्षात केंद्र व राज्य सरकारने जनहितासाठी घेतलेल्या विविध योजना तळागाळात जाण्यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हाभरातील कार्यकर्त्यांना सुचना देवून सरकारी योजनेचा फायदा गोरगरीब सर्वसामान्य लोकांना झाला पाहिजे यावरही मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
या बैठकीला भाजपा महाराष्ट्र सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकूर, संघटनमंत्री भाऊसाहेब देशमुख हे प्रमुख उपस्थिती राहून भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष तथा आमदार तानाजी मुटकुळे यांनी दिली असून या बैठकीला जिल्हाभरातील सर्व तालुका अध्यक्ष, शहर अध्यक्ष, सर्व जिल्हा आघाडीचे संयोजक, आजी-माजी लोकप्रतिनिधींनी उपस्थित रहावे असे आवाहन नगराध्यक्ष बाबाराव बांगर, माजी खा. शिवाजीराव माने, माजी आ. गजाननरावजी घुगे, ऍड.शिवाजीराव जाधव यांनी केले आहे
No comments:
Post a Comment