कसोटी मालिकेत भारताचे कमबॅक

Wednesday, August 22, 2018

बर्मिंगहॅम : 
भारताने बर्मिंगहॅम कसोटीत इंग्लंडचा २०३ धावांनी दारुण पराभव करत मालिकेतील पहिला विजय नोंदवला आहे. पाचव्या दिवसाच्या खेळाला सुरवात होताच भारताचा फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन याने जेम्स अॅंडरसनला बाद करुन भारताला विजय मिळवून दिला. या विजयामुळे पहिले दोन कसोटी सामने गमावणाऱ्या भारताचे मालिकेतील आव्हान कायम राहिले आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत आता इंग्लंडकडे २-१ अशी आघाडी घेतली आहे ५ कसोटी सामन्याच्या मालिकेत भारताने ३ री  कसोटी जिंकल्याने उर्वरित २ कसोटी सामने चुरशीचे होतील अशी अपेक्षा आहे 

सामन्याच्या चौथ्या दिवशी विजयासाठी फक्त एक बळी हवा असताना पंचानी दिवसाचा खेळ थांबवला. त्यामुळे भारताला विजयासाठी पाचव्या दिवसाची वाट पहावी लागली. मात्र पाचव्या दिवशी खेळ सुरु होताच अॅंडरसन 11 धावांवरक बाद झाला आणि इंग्लंडचा डाव 317 धावांवर संपुष्टात आला. 

आज अखेरच्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यानंतर अवघ्या ६ धावांची भर घालून इंग्लंडचा डाव ३१७ धावांवर संपुष्टात आला. अँडरसनच्या रूपाने अश्विनने इंग्लंडचा शेवटचा बळी टिपला. भारताने हा सामना २०३ धावांनी जिंकला असून लागोपाठ दोन पराभव पाहणाऱ्या भारतीय संघासाठी हा विजय नवी उभारी देणारा ठरणार आहे. 

या विजयानंतर विराट कोहलीने कर्णधार म्हणून यशाच्या बाबतीत सौरव गांगुलीला मागे टाकले आहे. गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारताने ४९ पैकी २१ कसोटी सामने जिंकले होते तर १३ सामन्यांत पराभव पदरी पडला होता. विराटच्या नेतृत्वाखाली भारत ३८ सामने खेळला असून त्यापैकी २२ सामन्यांत विजय मिळाला आहे तर केवळ ७ सामने भारताने गमावले आहेत. भारताच्या सर्वाधिक यशस्वी कर्णधारांमध्ये महेंद्रसिंग धोनी पहिल्या स्थानी आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने २७ कसोटीविजय मिळवले आहेत.

No comments:

Post a Comment