दिल्ली चंदिगड नांदेड विमान सेवा लवकरच- ना. सुरेश प्रभू
सरदार मंजितसिंघ जीके यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने घेतली भेट
नांदेड- अमृतसर नांदेड या विमान सेवेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने दिल्ली चंदिगड नांदेड अशी नविन सेवा लवकरच सुरू करण्यात येईल असे आश्वासन विमान वाहतूक मंत्री ना. सुरेश प्रभु यांनी दिले आहे.
अमृतसर ते नांदेड या एअर इंडियाच्या आठवड्यातून दोन दिवस सुरू असलेल्या विमान वारीला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. अमृतसर ते नांदेड अशी दर बुधवारी एक फेरी सुरू करण्यात यावी अशी मागणी सचखंड गुरूद्वारा बोर्डाने केली आहे. दिल्ली चंदिगड येथिल प्रवाशांना नांदेड ला येण्यासाठी विमान सेवा उपलब्ध नसल्यामुळे मोठी गैरसोय होते आहे.
यासाठी दिल्ली चंडिगड नांदेड अशी विमान सेवा सूरू करण्यासाठी हालचाली सुरु झाल्या असून केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ना. सुरेश प्रभू यांची दिल्ली गुरूद्वारा प्रबंधक कमिटीचे अध्यक्ष सरदार मंजितसिंघ जीके यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने नुकतीच दिल्लीत भेट घेऊन नांदेड ला जोडणारी दिल्ली चंडिगड सेवा सूरू करण्याची मागणी केली. याबाबत लवकर निर्णय घेतला जाईल व दिल्ली नांदेड अशी विमान सेवा सूरू करण्यात येईल असे ना. सुरेश प्रभू यांनी सांगितल्याचे सरदार जसबिरसिंघ धाम यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.
या शिष्टमंडळात दिल्ली गुरूद्वारा प्रबंधक कमिटीचे अध्यक्ष सरदार मंजितसिंघ जीके, अकाली दलाचे खासदार सरदार प्रेम सिंघ चंदमांजरा,धर्म प्रचार समितीचे चेअरमन व दिल्ली गुरूद्वारा बोर्ड मॅनेजमेंट कमिटीचे सदस्य सरदार परमजातसिंघ राणा यांचा समावेश होता.
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:
Post a Comment