
२९ ऑगस्ट रोजी होणार उद्घाटन
लातूर दि- सत्यजीत बद्दर
लहानांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकाला जे जे हवं ते ते मिळावं यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर आग्रही आहेत. यामुळेच समाजातील प्रत्येक घटकाला काहीतरी देण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे .हे करताना मतदारही नसलेल्या लहान बालकांसाठी बालशिवाजी अडव्हेन्चर पार्क सुरू करण्याचा निर्णय त्यांनी घेतला असून येत्या २९ ऑगस्ट रोजी या पार्कचे उद्घाटन होणार आहे.
शैक्षणिक दृष्ट्या राज्यभरात पुढारलेल्या लातुरात बालकांसाठी फारशा सोयी सुविधा नाहीत .लहान मुलांना खेळण्यासाठी मैदाने आणि क्रीडा साहित्यही उपलब्ध नाही .ही बाब ओळखून पालकमंत्री निलंगेकर यांनी असे अडव्हेन्चर पार्क उभारण्याचा निर्णय घेतला होता .केवळ निर्णय घेऊनच ते थांबले नाहीत तर त्यासाठी आवश्यक बाबींची तजवीजही त्यांनी केली .पालकमंत्र्यांचे बंधू युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर आणि जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी त्यासाठी पाठपुरावा केला .यामुळेच तीन ते दहा वर्ष वयोगटातील बालकांसाठी ७००० चौरस फूट जागेत चिल्ड्रन पार्क आणि अडव्हेन्चर पार्क उभारण्यात येत आहे .बालकांना खेळण्यासाठी या पार्कमध्ये सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. लहान मुलांचे खेळ ,मैदानी खेळ आणि त्यांची बुद्धिमत्ता वाढीस लागण्यासाठी आवश्यक असणार्या खेळांचा या पार्कमध्ये समावेश असणार आहे .पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर ,अरविंद पाटील आणि जिल्हाधिकारी जि श्रीकांत यांच्या कल्पक नियोजनातून सुरू होणारा हा बालशिवाजी अडव्हेन्चर पार्क लातूरचे वेगळेपण ठरणार आहे .प्रत्येक बाबीत राजकारण न करता जनतेला सोयीसुविधा पुरविण्यासाठी प्रयत्नात असलेल्या पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्यामुळेच हा चिल्ड्रन पार्क लातुरात उभारणार आहे.
कोणत्याही गावात किंवा शहरात राहणारा नागरिक शाररिक तथा मानसिक दृष्टया तंदुरुस्त असला पाहिजे तरच तो जीवनात प्रगती करू शकतो लातूर येथे जिल्हा क्रीडा संकुल मैदानावर त्या दृष्टीने अनेक महत्वपूर्ण प्रकल्प , उपक्रम हाती घेण्यात आले आहेत खऱ्या अर्थाने हे उपक्रम पूर्णत्वास आल्यानंतर क्रीडा संकुलनाचे कायापालट होईल असेच म्हणावे लागेल त्या दृष्टीने बाल शिवाजी चिल्ड्रन्स अडव्हेंचर्स पार्क या ठिकाणी उभारले जात आहे त्यात ३ ते १० वर्ष वयोगटातील बालकांसाठी साहसी क्रीडा साहित्य या ठिकाणी उपलब्ध करून दिले जाणार आहेत त्यात क्रौलिंग , रोप क्लायंबिंग , ब्लेंसिंग बीम , आदी क्रीडा प्रकार असणार आहेत बहुदा १५ ऑगस्ट पर्यंत या प्रकल्पाची उभारणी पूर्ण होईल
![]() |
| काल्पनिक चित्र |
अद्यावत होतोय क्रीडासंकुल
बाल शिवाजी चिल्ड्रन्स अडव्हेंचर्स पार्क सोबतच या ठिकाणी ४०० मीटर धावपट्टी(ट्रॅक)उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आहे खेळाडूंना मानसिक आणि शारीरिक दृष्टया मजबूत करण्यासाठी रिहॅबिलिटेशन सेंटर उभारले जात आहे त्याचेही काम अंतिम टप्प्यात आले आहे विविध स्पर्धाच्या निमित्ताने लातूर ला येणाऱ्या खिळाडूंना उत्तम सुविधा मिळाव्यात या साठी मोडकळीस आलेल्या वसतिगृहाचे नूतनीकरणही केले जात आहे या शिवाय व्हॉलीबॉल कोर्ट , बास्केटबॉल कोर्ट , स्केटींग रिंग , या ठिकाणी फ्लड लाईट बसवले जाणार आहे. ४ ठिकाणी हायमस्ट दिवे लावले जाणार आहेत. लॉन टेनिस कोर्ट तसेच सीसी टीव्ही साठी तांत्रिक मान्यता मिळाली आहे क्रिकेट खिळाडूंसाठी अत्याधुनिक टर्फ पीच व सिमेंट काँक्रीट पीच तयार करण्याचे काम प्रगती पथावर आहेत जिल्हा क्रीडा संकुल विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण व्हावे या साठी संपूर्ण संकुल सोलर युनिट वर चालण्यासाठी तसा प्रस्ताव क्रीडा विभागाकडे पाठवण्यात आला आहे .
सीएसआर फंड मधून बायो टॉयलेट, डीपीडीसी निधीमधून ओपन जिम पण पूर्ण होत आहे या ठिकाणी स्वछतेच्या दृष्टीने कचरा कुंडी बसविण्यात आली आहे म्युझिक सिस्टम हि अपडेट करण्यात आली आहे येत्या राष्ट्रीय क्रीडा दिनी अर्थात २९ ऑगस्ट रोजी जिल्हा क्रीडा संकुलनावरील या प्रकल्पाचे उदघाटन केले जाणार आहे अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी नीलिमा अडसूळ यांनी मराठवाडा नेता शी बोलताना दिली .
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा 9333333548 हा आमचा नंबर
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:
Post a Comment