यानंतर याप्रकरणी दाखल करण्यात आलेली तक्रार मागे घेण्यात आली आहे. . जवळपास दहा दिवसांपूर्वी चिदंबरम यांच्या घरात चोरी झाल्याची घटना आता समोर आली आहे. चिदंबरम यांच्या पत्नी नलिनी या घरी परतल्यानंतर त्यांना चोरीची गोष्ट लक्षात आली. यानंतर नलिनी यांच्या व्यवस्थापकाने शनिवारी रात्री याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. १.५० लाखांची रोकड आणि १ लाख रुपये किमतीचे दिागने व सहा सिल्क साड्या चोरीला गेल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.
पोलिसांनी घरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन केलेल्या तपासात चोरीमागे चिदंबरम यांच्या सफाई कर्मचाऱ्यांचा हात असल्याचे समोर आले. दोन्ही महिलांनी चोरीचा सर्व माल परत केल्याचे चिदंबरम यांचा मुलगा कार्ती चिदंबरम यांनी सांगितले आहे. याप्रकरणी दाखल करण्यात आलेली तक्रारदेखील मागे घेण्यात आल्याचे ते म्हणाले.
मराठवाडा लोकल ते ग्लोबल ब्रेकिंग न्यूज अपडेट्स देणार हक्काचे व्यासपीठ.
http://www.mnetaonline.com
राहा अपडेट कधीही,कुठेही वाचा बातम्या तुमच्या मोबाईलवर !

No comments:
Post a Comment