इंग्लंडवर ७ गडी राखून विजय,भारताने ट्वेण्टी-२० मालिकेचे विजेतेपद पटकावले.

Monday, July 9, 2018


रोहित शर्माचे तडाखेबंद शतक आणि हार्दिक पंड्याच्या (३३) फटके बाजीवर भारताने ट्वेण्टी-२० मालिकेचे (२-१) विजेतेपद पटकावले. रोहित शर्माने केवळ ५६ चेंडूंत ११ चौकार व ५ षटकारांनी शतक झळकावले. रोहितचे ट्वेण्टी-२० च्या कारकीर्दीतले हे तिसरे शतक ठरले. या दोघांच्या फटकेबाजवीर भारताने अंतिम ट्वेण्टी-२० सामन्यात इंग्लंडवर ७ गडी राखून विजय मिळवला.
शिखर धवन (५) तिसऱ्या षटकात बाद झाल्यामुळे भारताच्या डावाची सुरुवात अडखळती झाली. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस उतरलेल्या लोकेश राहुलला साथीला घेत रोहित शर्माने डाव पुढे चालवला. या जोडीच्या फटकेबाजीवर भारतानेही इंग्लंडप्रमाणे ४.५ षटकांत धावांचे पहिले अर्धशतक धावफलकावर लावले. पहिल्या ट्वेण्टी-२० सामन्यात शतक झळकावणारा लोकेश राहुल (१९) मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरला.

मराठवाडा लोकल ते ग्लोबल ब्रेकिंग न्यूज अपडेट्स देणार हक्काचे व्यासपीठ. 
http://www.mnetaonline.com 
राहा अपडेट कधीही,कुठेही वाचा बातम्या तुमच्या मोबाईलवर !

No comments:

Post a Comment