पेट्रोलपंप,हॉटेल व ट्रॅव्हल्स चालकांनी शौचालय निर्माण करावीत -जिल्हाधिकारी जी.श्रीकांत

Monday, July 9, 2018

लातूर दि.07- जिल्हयातील सर्व पेट्रोल पंप चालक हॉटेल मालक व खाजगी ट्रॅव्हल्स कंपनीच्या मालकांनी दि.1 ऑगस्ट 2018 पर्यंत महिलांसाठी संरक्षित शौचालय निर्माण करणे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांचे परवाने रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल असे,निर्देश जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयेजित प्रशासन,पेट्रोल,हॉटेल व ट्रॅव्हल्स कंपनीचालक, भारतीय स्त्री शक्ती संघटना या स्वयंसेवी संस्थेच्या संयुक्त आढावा बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विपीन ईटनकर,परिविक्षाधिन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संजय ढगे,जिल्हा आरोग्‍ अधिकारी डॉ.गंगाधर परगे,भारतीय स्त्री संघटनेच्या डॉ.ज्योत्सना कुकडे,मीरा नायगावकर,कुमिदी भार्गव,उपमुख्य कार्यकारी अधिकारी (म व ब)जे.एस.शेख,जिल्हा महिला व बालविकास अधिकारी वर्षा पवार,पेट्रोल पंप , हॉटेल व ट्रव्हल्स एजन्शीचे मालक मोठया संख्येने उपस्थित होते.

जिल्हयातील हॉटेल, पेट्रोल पंप चालकांना अकृषक वापर परवाना व हॉटेल पट्रोलपंप व्यवसायिकांना व्यवसायिक परवाना देताना नागरी सुविधा देणे बंधनकारक आहे. यामध्ये शैचालयाचा समावेश असून प्रत्येक व्यवसायिकांनी महिलांचा सन्मान म्हणून आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी उत्कृष्ट सुविधा असलेले संरक्षित शौचालये निमार्ण करावित व ज्या ठिकाणी पूर्वीपासून आहेत त्या व्यवसायिकांनी चांगली स्वच्छता ठेवावी. तर ट्रॅव्हल्स कंपन्यांनी ट्रॅव्हल्समध्ये शौचालये निर्माण करण्यासाठी पुढे यावे तसेच प्रवासामधील ज्या हॉटेल व पेट्रोलपंपावर संरक्षित शौचालय आहेत अशा ठिकणी गाडी थांबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी दिले.

पेट्रोल पंप ,हॉटेल व ट्रॅव्हल्स चाकांनी 1 ऑगस्ट 2018 पर्यंत महिलांसाठी शौचालयाची सुविधा उपलब्ध न केल्यास त्या व्यवसायिकावर परवाना रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल. दि.1 ऑगस्ट 2018 नंतर जिल्हयातील हॉटेल,पेट्रोल पंपाची तपासणी करण्यात येणार आहे व ट्रव्हल्स कंपन्यांचाही आढावा घेण्यात येऊन शौचालयाची सुविधा न देणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात होईल असे जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी स्पष्ट केले.

बेटी बचाओ बेटी पढाओ अंतर्गत एक तयार करून त्याद्वारे जिल्हयातील संरक्षित शौचालयाची यादी करण्यात योणार आहे.या कामासाठी भारतीय स्त्री संघटनेची लातूर कार्यकारणी सहकार्य करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी दिली.

यावेळी संबंधित व्यवसायिकाकडून ही सूचना आल्या व दि.1 ऑगस्ट 2018 पर्वी महिलांचा सन्मान ठेवून त्यांना प्रवासात कोणतीही आडचण येणार नाही यासाठी आप-आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी संरक्षित शैचालये निर्माण करण्याची ग्वाही उपस्थित व्यवसायिकांनी दिली.
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment