मराठवाड्याचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर शिक्षण हा एकमेव मार्ग असून कठोर परिश्रम व आत्मविश्वासाने व शिक्षणातून आपल्याला वाटचाल करावी लागणार आहे असे मत सेवानिवृत्त जलसंपदा विभागाचे सचिव व्यंकटराव गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिंदे होते. तर प्रमुख पाहूणे म्हणून सत्कारमुर्ती... हे होते.
प्रास्ताविकात आमदार ज्ञानराज चौगुले म्हणाले की, ग्रामीण विद्यार्थ्यांचा शैक्षणिक टक्क वाढला पाहिजे. आणि आपल्या भागातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात शैक्षणिक क्षेत्रात नावलौकिक मिळविला पाहिजे. या उद्देशाने ज्ञानज्योती सेवाभावी संस्थेच्या वतीने गेल्या नऊ वर्षापासून दरवर्षी गुणवंतांचा सत्कार गोरगरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तसेच आयएएस, आयपीएस, एमपीएससी परिक्षेत मिळविणार्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला जातो. यासाठी एवढ्या मोठ्या सं‘येने संस्थाचालक, विद्यार्थी उपस्थित आहेत. या सर्वांचे मी मनपुर्वक स्वागत करतो. त्याचा उद्देश गुणा बरोबर धन सुद्धा वाढले पाहिजे.
या प्रसंगी मार्गदर्शन करताना व्यंकटराव गायकवाड म्हणाले की, मला या कार्यक्रमाचे वैशिष्ट्ये म्हणजे पन्नास टक्के महिलांची उपस्थिती आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या संस्थांचाही सत्कार केला जातो. तेही आम्हाला महत्वाचे वाटते. या कार्यक‘माची विद्यार्थ्यांची उपस्थितीही तेवढीच महत्वाची आहे. या संपुर्ण कार्यक‘माचे यशस्वी नियोजन करत असल्याबद्दल आमदार चौगुले आणि त्यांच्या सहकार्याना मी धन्यवाद देतो. अभिनंदन करतो. शिक्षणातून स्वाभीमान शुन्य माणूस बनता कामा नये तर तो आनंदी, समाधानी राष्ट्रभक्त बनला पाहिजे. मी आमदार चौगुले यांना मनापासून धन्यवाद देतो. कारण सातत्याने गुणवंतांचा सत्कार, गरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचे काम ते करत आहेत.
यावेळा बडोले, दिपक फोफळे यांनी समयोचित विचार मांडले. कार्यक्रमाच्या शेवटी जितेंद्र शिंदे यांनी आजच्या परिस्थितीत शिक्षणाबरोबरच माणूस स्वावलंबी स्वाभीमानी झाला पाहिजे यासाठी करावयाचा प्रयत्नाचा ओहापोह केला आहे. आणि विविध उदाहणांच्या माध्यमातून त्यांनी लोकांना डोळ्या अंजन घालणारे उदाहरणं देवून जीवन कसं जगावं या संदर्भात सविस्तर उदाहरणं दिली. संवाद तज्ञ शिंदे यांचं भाषण हे खास आकर्षण ठरलं.
आमदार ज्ञानराज चौगुले यांनी या कार्यक्रमाचे सुरेख नियोजन केले होते. शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. चिंचोळी सभागृह गच्च भरल्यामुळे सभागृहाच्या बाहेर स्क्रीन लावून व्यवस्था करण्यात आली होती. एखाद्या जाहीर सभेप्रमाणे गुणवंताच्या सत्काराला प्रचंड गर्दी झालेली होती. यावेळा मार्केट कमेटीचे सभापती सुलतान तसेच राज्यस्तरीय आदर्श शिक्षीका सरिता उपासे, डॉ. दिपक पोफळे, डॉ. रमाकांत जोशी हे उपस्थित होते.
आमदार ज्ञानराज चौगुले यांनी या कार्यक्रमाचे सुरेख नियोजन केले होते. शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. चिंचोळी सभागृह गच्च भरल्यामुळे सभागृहाच्या बाहेर स्क्रीन लावून व्यवस्था करण्यात आली होती. एखाद्या जाहीर सभेप्रमाणे गुणवंताच्या सत्काराला प्रचंड गर्दी झालेली होती. यावेळा मार्केट कमेटीचे सभापती सुलतान तसेच राज्यस्तरीय आदर्श शिक्षीका सरिता उपासे, डॉ. दिपक पोफळे, डॉ. रमाकांत जोशी हे उपस्थित होते.
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा 9333333548 हा आमचा नंबर
Add करा 9333333548 हा आमचा नंबर
No comments:
Post a Comment