आज शैलेश लाहोटी यांचा जन्म दिवस त्यांच्या जन्म दिवसानिमीत्त दैनिक मराठवाडा नेताच्या वतीने त्यांना कोटी-कोटी शुभेच्छा. त्यांना निरोधी दिर्घायुष्य लाभावे व येणार्या काळात त्यांनी गोर गरीब कष्टकरी श्रमिक यांच्या हिताचे कल्याणाचे कार्य करावे ही शुभेच्छा.
शैलेश लाहोटी हे शालेय जिवनापासूनच कुशल संघटक व गोरगरीबांना मदत करणारे म्हणून परिचित आहेत. त्यांनी भारतीय जनता पार्टीत निवडणुकीच्या एक महिना अगोदर प्रवेश केला. तसं त्यांचा ग्रामीण भागात म्हणावां तेवढा संपर्क नव्हता. पण विधानसभा निवडणुकीच्या काळात त्यांनी कॉंग्रेसला पळता भुई केली होती. निवडणुकीच्या पराभवाने ते निराश झाले नाहीत. उलट ते सर्व सामान्यांच्या हितासाठी, कल्याणासाठी प्रयत्न करतात. त्यांनी भिषण पाणीटंचाईच्या काळात स्वत: आपल्या मित्रमंडळींच्या व पक्षकार्यकर्त्यांच्या सहकार्याने पाणी टंचाईचे नियोजन केले.
मनप निवडणुकीत महत्वपुर्ण भुमिका
शैलेश लाहोठी हे जरी लाहोटी आणि श्रीमंत असले तरी सर्वसामान्यांत मिळून मिसळून वागण्याचा त्यांचा स्वभाव अठरा प्रगट जातीच्या युवकांना लोकांना सोबत घेऊन काम करण्याची त्यांची पद्धत यामुळेच पक्षाचे नेतृत्व जिल्ह्याचे पालकमंत्री व सहकार्यांच्या साथीतून त्यांनी लातूर महानगरपालिकेतून कॉंग‘ेसला हद्दपार केले. कोण म्हणतो शैलेश लाहोटी हे सकाळी लवकर उठत नाहीत असा त्यांच्यावर आरोप व्हायचा. पण इंद्रप्रस्थ जलभुमी अभियानाच्या वेळा सकाळी इंद्रप्रस्थ जलभुमी अभियानाच्या कार्यक्रमात ते सकाळी साडेसहा वाजता प्रभागात असायचे. राजस्थान संस्थेचे अध्यक्ष साधारणत: आठ महिन्यापुर्वीच शैलेश लाहोटी यांची राजस्थान शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी निवड झाली.
आणि त्या ठिकाणीही ते विद्यार्थ्यांचा शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक विषयक प्रगतीसाठी प्रयत्न करत आहेत. शैलेश लाहोटी यांनी येणार्या काळात आणखीन जोमाने, आत्मविश्वासाने, निर्धाराने पक्ष वाढीसाठी काम करावे कारण ते कुशल संघटक आहेत. त्यांना लातूर शहरातील सर्व प्रभागाची सर्वांगिण माहिती आहे.
आणि अशा परिस्थितीत देशात नरेंद्र मोदी, राज्यात देवेंद्र फडणवीस, जिल्ह्यात पालकमंत्री संभाजीराव पाटील यांच्या नेतृत्वात त्यांनी सकारात्मक भुमिकेतून लातूर शहराच्या विविध विकासाच्या प्रश्नांना गती द्यावी तसंच मुख्यमंत्र्यांचे सचिव अभिमन्यू पवार यांच्या मार्गदर्शनात अधिकात अधिक निधी आणावा व जे वेगवेगळ विकास कामे प्रलंबित आहेत. ते निकाली काढावेत त्यांच्या वाढदिवसानिमीत्त दैनिक मराठवाडा नेताच्या वतीने शुभेच्छा.
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा 9333333548 हा आमचा नंबर
Add करा 9333333548 हा आमचा नंबर
No comments:
Post a Comment