मोदी शाह यांचा २०१९ जिकंण्याचा हा आहे मास्टर फॉर्मुला

Monday, July 9, 2018

मोदी या दिग्गज मंत्र्यांसह अर्ध्या खासदारांचे तिकीट कापणार 
 मोदी महाराष्ट्रातील त्या १० खासदारांचे  तिकीट कापणार  ?

नवी दिल्ली २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांसाठी भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्रातील २२ विद्यमान खासदारांपैकी १० खासदारांना नरेंद्र मोदी हे नारळ देऊन घरचा रस्ता दाखवणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे त्या मुळे ते १० खासदार कोण या वरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे 

सन २०१४ मध्ये झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकात मोदी लाटेवर निवडून आलेल्या अनेक दिग्गज मंत्र्यांसह ५० टक्के खासदाराचे नरेंद्र मोदी यांनी तिकीट कापण्याचे निश्चित केले असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सामंजते त्याचे कारण म्हणजे असे आहे कि त्या मंत्र्यांचा व त्या खासदारांची कामगिरी हि सुमार असल्याचे कारणावरून तिकीट नाकारले जाणार आहे अशी एका वर्तमान पत्राने गौप्यस्फोट केला आहे . 

२०१९ मध्ये पुन्हा एकदा सत्ता काबीज करण्यासाठी नरेंद्र मोदी व अमित शाह हे रणनीती करत आहेत त्या रणनीतीचा भाग म्हणून देशातील १५० खासदारासह अनेक दिग्गज ना डच्चू देणार आहेत यात केंद्रीय मंत्रिमंडळातल्या दिग्गज नावांचाही समावेश आहे.

सुषमा स्वराज, राधामोहन सिंह, उमा भारती तीन दिग्गज मोहरे
2019 च्या लोकसभा निवडणुकीत या तिघांनाही पक्षाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता नाही. . सुषमा स्वराज ह्या किडनीच्या उपचारामुळे पुन्हा इतकी धावपळ करु शकणार नाहीत. राधामोहन, उमा भारती यांनी स्वत:च आपण लढायला उत्सुक नसल्याचं पक्षाला सांगितलं आहे. जवळपास 150 खासदारांना भाजप तिकीट नाकारण्याची शक्यता आहे.
तिकीट नाकारण्याचं काय कारण?
2014 ला भाजपचे अनेक खासदार केवळ मोदी लाटेत निवडून आले. मुरली मनोहर जोशी, बीसी खंडुरी यांच्यासारख्या काही नेत्यांना वय झाल्यामुळे पुन्हा संधी दिली जाणार नाही. ज्या खासदारांनी परफॉर्मन्स दिला नाही त्यांना रेड सिग्नल दाखवला जाणार आहे. संसदीय पक्षाच्या मीटिंगमध्ये खासदाराना घरी बसवू असा थेट इशारा मोदींनी अनेकदा दिलेला आहे. संसदेतल्या उपस्थितीबद्दल अनेकदा बजावूनही ओबीसी कमिशनसारखं महत्त्वाचं विधेयक भाजप खासदारांच्या गैरहजेरीने मागे घेण्याची नामुष्की आली होती

 खासदार निवडीचे  निकष
  • - संसदेत त्यांची उपस्थिती कशी आहे, सभागृहात किती प्रभाव पाडू शकले आहेत?
  • - केंद्रीय योजनांची आपल्या भागात त्यांनी कशी अंमलबजावणी केली आहे?
  • - सरकारी योजनांचा सोशल मीडियावरुन प्रसार करण्यात ते अॅक्टिव्ह आहेत का?
  • - खासदारांची मतदारसंघातली कामगिरी कशी आहे?
  • -हे सगळे निकष तपासूनच पुन्हा तिकीटासाठी विचार होणार आहे. 
  • महत्त्वाचं म्हणजे मंत्री आहे म्हणून कुणाचा अपवादही केला जाणार नाही.

सरकारविरोधातली नाराजी मतदानात रुपांतरित होऊ नये यासाठी मोदी-शाह जोडीचा हा अगदी सुपर हिट फॉर्म्युला आहे. गुजरातचे मुख्यमंत्री असतानाही मोदी याच पद्धतीने पुन्हा पुन्हा सत्ता काबीज करत आले आहे. 

काय आहे मोदींचा हिट फॉर्म्युला? 

  • - चेहरे बदलत राहणे हा मोदींचा गुजरातमधला हिट फॉर्म्युला
  •  - 2007 मध्ये मोदींनी भाजपच्या 120 आमदारांपैकी तब्बल 43 आमदारांना तिकीट नाकारलं होतं. 
  • म्हणजे जवळपास एक तृतीयांश आमदार घरी बसवले.- 2012मध्ये हा नंबर 30 वर आला. 
  • - अगदी 2002 मध्ये पहिल्यांदाच त्यांच्या नेतृत्वात भाजप लढत असतानाही मोदींनी 18 आमदारांना तिकीट नाकारलं होतं
2014 मध्ये भाजपला एकट्याच्या बळावर 282 खासदार मिळाले होते. 1984 नंतर पहिल्यांदाच इतकं स्पष्ट बहुमत कुठल्या पक्षाला मिळालं. पण ही लाट पुन्हा टिकवणं कठीण आहे. त्यामुळेच मोदी-शाह जोडीचा चेहरे बदलण्याचा फॉर्म्युला कितपत यशस्वी होतो याची उत्सुकता असेल.

मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment