वसमत/ प्रतिनिधी
येथील गंगाप्रसाद अग्रवाल शॉपिंग कॉम्प्लेक्स येथील मुळे व अडकिने यांच्या दोन मोबाईल दुकानातून सोमवारी रात्री ते मंगळवारी सकाळच्या दरम्यान 35 मोबाईल अंदाजे कीमत 2 लाख 15 हजारचा मुद्देमाल चोरुन नेल्याप्रकरणी पो.नि रविंद्रसिंग धुन्ने यांनी तपास चक्रे फिरवत तात्काळ काही तासातच सहा संशयिताना ताब्यात घेतले आहे.
अधिक माहिती अशी की 9जुलै रात्री 9 ते 10 जुलै सकाळी 6 च्या दरम्यान येथील स्वा.सै.गंगाप्रसाद अग्रवाल शॉपिंग कॉम्प्लेक्स येथील मुळे यांची नृसिह मोबाईल शॉपी व नवनाथ विश्वनाथ अडकिने यांची अडकिने मोबाईल शॉपी यां दोन मोबाईल शॉपचे शटर वाकवून व लॉक तोडून दुकांनातिल 35 मोबाईल ज्याची अंदाजे किंमत 2 लाख 15 हजारांचा मुद्देमाल अज्ञात चोरटयांनी चोरुन नेला ही माहिती मिळताच पोलीस उपाधिक्षक शशिकिरण काशिद यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिस स्थानकाचे पो.नि.रविंद्रसिंग धुन्ने यांनी आपले सहकारी पोहेका राजु सिद्दीकी, हेन्द्रे, किशन चव्हाण,साहेबराव चव्हाण आदिच्या पथकाला सोबत घेऊन घटना स्थळी भेट दिली व सिसि टीव्ही फुटेच वरुण तपास चक्रे फिरवत सहा संशयींतांना ताब्यात घेतले असून त्यांची कसुंन चौकशी सुरु आहे.
प्रकरणाचा पुढील तपास पो.नि रविंद्रसिंग धुन्ने यांच्या मार्गदर्शनाखाली ए.एस.आय.सुरदुसे करीत आहेत. पोलीस विभागाच्या या तत्परतेमुळे काही तासातच दोन मोबाईल दुकानातील चोरीचे संशयीत आरोपी जेरबंद झाल्याने व्यापारी शहर पोलिसांच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त करीत आहेत. भविष्यात अशा घटना घडू नये या साठी रात्री ची गस्त वाढवण्याची मागणी व्यापाऱ्यातून होत आहे.
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा 9333333548 हा आमचा नंबर
Add करा 9333333548 हा आमचा नंबर
No comments:
Post a Comment