मारहाणीमुळे विवाहितेच्या गर्भपिशवीला दुखापत,कोर्टाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल.

Monday, July 9, 2018

नांदेड : सासरच्या मंडळींनी केलेल्या मारहाणीमुळे विवाहितेच्या गर्भपिशवीला दुखापत झाली आणि उपचार न करता तिला माहेरी हाकलून दिल्या प्रकरणी सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नांदेडच्या शिवाजीनगर भागातील रहिवासी पूजा किशन मोरे हिचे सासर लोहा तालुक्यातील नीळा आहे. 

लग्न झाल्यापासून सासरी पती किशन, सासू अनसुया काशीनाथ, दत्ता काशीनाथ, शांता दत्ता, हनमंत काशीनाथ, रंजना हनमंत यांनी माहेराहून तीन लाख रुपये घेऊन ये म्हणत मानसिक व शारीरिक छळ करीत शिविगाळही केली. तसेच पैसे न आणल्याने मारहाणही केली. या मारहाणीमुळे पूजाच्या गर्भपिशवीला दुखापत होऊन रक्ताच्या गाठी झाल्या. यावर उपचार न करता सासरच्या मंडळींनी तिला माहेरी पाठवून दिले. 

मराठवाडा लोकल ते ग्लोबल ब्रेकिंग न्यूज अपडेट्स देणार हक्काचे व्यासपीठ. 
http://www.mnetaonline.com 
राहा अपडेट कधीही,कुठेही वाचा बातम्या तुमच्या मोबाईलवर !

No comments:

Post a Comment