चौदाव्या मिनिटाला सर्वसाधारण सभा रद्द
लातूर दि मराठवाडा नेता ऑनलाईन
लातूर शहर मनपाच्या इतिहासातील लाजिरवाणी घटना सत्ताधारी भाजपच्या गटबाजीमुळे घडली आहे कालच्या स्थायी समिती पाठोपाठ आज जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित केलेली सर्वसाधारण सभा अवघ्या १४ व्या मिनिटाला रद्द करण्याची दुर्दैवी वेळ महापौरावर आली सत्ताधारी नगरसेवकांनीच महापौरांवर अविश्वास दर्शविल्याने त्यांनी राजीनामा द्यावा अथवा भाजपने त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे .
उपमहापौर गैरहजर
आजच्या सर्वसाधारण सभेस उपमहापौर देविदास काळे यांनीही बहिष्कार टाकला या शिवाय २९ नगरसेवक भाजपचे गैरहजर राहिले या बाबत सभागृहात उलट सुलट चर्चा होत होती
कालच स्थायी समितीच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते त्याही सभेला गणपूर्ती झाली नसल्याने सभा रद्द करण्याची नामुष्की सभापती शैलेश गोजमगुंडे यांच्यावर आली होती दुसऱ्याच दिवशी अर्थात आज मंगळवारी म्हणत्वपूर्ण विषयावर चर्चा करण्यासाठी जिल्हा नियोजन सभागृहात सर्वसाधारण सभा आयोजित केली होती सभेस महापौरांसह शैलेश गोजमगुंडे , शैलेश स्वामी ,संजय रंदाळे , सौ शीतल मालू , ज्योती अवस्कर ,आणि सौ श्वेता लोंढे असे सातच नगरसेवक उपस्थित राहिले काही वेळ वाट पाहून १४ व्या मिनिटाला महापौर सुरेश पवार यांनी अपरिहार्य कारणामुळे आजची सभा रद्द करत असल्याचे जाहीर केले .
आज पर्यंत सत्ताधारी भाजपातील नगरसेवकांमध्ये असलेला असंतोष आणि गटबाजी ऐकिवात होती परंतु स्थायी समिती आणि आजच्या सर्वसाधारण सभेनंतर ती चव्हाट्यावर आली असून लातूर शहराच्या विकासाच्या दृष्टीने ते अत्त्यंत घातक असाचल्याची चर्चा सर्वत्र होत आहे
महापौरांचा गलथान कारभार : दीपक सूळ
ज्या पक्षाचा महापौर आहे त्याच पक्षाच्या नगरसेवकाचा महापौर सुरेश पवारांवर विश्वास नाही त्यांच्या गलथान कारभारातून सत्ताधारी भाजपचे नगरसेवक नाराज आहेत त्या मुळे आम्ही सभागृहात येण्याचा प्रश्नच येत नाही अशी प्रतिक्रिया विरोधी पक्ष नेते दीपक सूळ यांनी मराठवाडा नेता शी बोलताना म्हणाले
दुर्दैवी घटना : अशोक गोविंदपूरकर
स्थायी चे माजी सभापती अशोक गोविंदपूरकर यांनी आजच्या सर्वसाधारण सभेचा अजेंडा आम्हाला विचारात घेऊन तयार केला नाही या शिवाय लातूरच्या इतिहासातील कोरम अभावी सर्वसाधारण सभा रद्द करण्याची दुर्दैवी घटना प्रथमच घडली असल्याची प्रतिक्रिया मराठवाडा नेता शी बोलताना दिली
प्रकाश पाठकांचा इशारा
लातूर शहर मनपाच्या सर्वसाधारण सभा बेकायदेशीर चुकीची असून महापौरांच्या अनागोंदी कारभाराविरुद्ध नगरसेवक प्रकाश पाठक यांनी मुबंई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे त्यांनी सर्वपक्षीय नगरसेवकांना आजच्या सर्वसाधारण सभेस उपस्थित राहू नये अन्यथा तुमचे पद धोक्यात येऊ शकते असा इशारा दिला होता परिणामी आज च्या सभेकडे विरोधकांसह सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांनीही पाठ फिरविली.नेतृत्वाने लक्ष घालावे
लातूर शहर मनपाच्या निवडणुकीमध्ये लातूरकरांनी मोठ्या अपेक्षेने भाजपवर विश्वास दाखवून मनपा त्यांच्या ताब्यात दिली केंद्रात आणि राज्यात भाजपाची सत्ता असतानाही विकासकामाकडे दुर्लक्ष करून आपसातील गटबाजीमुळे सत्ताधाऱ्यांनवर आज ची दुर्दैवी घटना ओढवली आहे . निवडणुकांमध्ये जनतेसमोर मते मागणार्यांनी मनपातील अनागोंदी कारभाराकडे गांभीर्याने पाहून आतातरी लक्ष घालावे व लातूरच्या इतिहासात कधी नव्हे एवढी सुवर्णसंधी मिळाली आहे त्याचा सदुपयोग करावा व केंद्रातून व राज्यातून निधी आणावा अशी मागणी जनतेतून होत आहे.
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, Add करा 9333333548 हा आमचा नंबर
No comments:
Post a Comment