लातूर / प्रतिनिधी
जिल्ह्याचे पालकमंत्री ना. संभाजीराव पाटील निलंगेकर हे लातूर जिल्ह्यामध्ये फिट इंडिया यासाठी प्रयत्न करत आहेत. आणि त्याचाच एक भाग म्हणून लातूर जिल्हा क्रिडा संकूलावर एक कोटी 44 लाख रूपयांचे वेगवेगळे प्रकल्प सुरू आहेत. याचा पाठपुरावा जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी जी. श्रीकांत करत आहेत. आणि या कामाच्या गुणवतेकडे व पाठपुराव्यासाठी युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांचे प्रयत्न आहेत. तसेच जिल्हा क्रिडा अधिकारी निलीमा अडसुळ या जे महाराष्ट्रात नाही ते लातूरात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा प्रकारे 1 कोटी 44 लाख रूपयांची वेगवेगळे प्रकल्प सुरू आहेत.
क्रिंडांगणावर रिहॅबीटेशन खेळाडू जखमी झाल्यानंतर तेथे तात्काळ त्याच्यावर उपचार करणे व त्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध करणे यासाठी 35 लाख 42 हजार रूपयांची तदतुद करण्यात आली आहे. 2. या क्रिडा संकूलावर 3 क्रिकेट स्पीच बनविण्यात येत आहेत. त्यापैकी दोन टर्फीकेट पीच आहेत. ज्याला चिकनमाती वापरावी लागते. याचा खर्च 31 लाख 75 हजार आहे. 3. 400 मीटर रनिंग ट्रॅक यासाठी 31 लाख 75 हजार रूपयांचे कम प्रगतीपथावर आहे. 4. 25 लाख 40 हजार खर्च करून चिल्ड्रन पार्क करण्यात येत आहे. 5. त्याचप्रकारे या मैदानावर अंधार पडू नये म्हणून मोठे दिवे बसविले जाणार आहेत. त्याचे साठ टक्के काम पुर्ण झाले असून 21 लाख 97 हजार रूपये याचा अंदाजपत्रक आहे.
यासाठी 16 मीटर उंचीचे पोल या ठिकाणी करण्यात येणार आहेत. तसेच मिनीरोलर 6 लाख 64 हजार रूपयांचे लवकरच घेण्यात येत आहे. 1 कोटी 44 लाख 11 हजार रूपयांची कामे प्रगतीपथावर आहेत. त्याचप्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी सीएसआर फंडातून बायोटॉयलेट वॉटर स्टोनरेज टॅंक, स्प्रींकलर बसविण्यात येणार आहेत. बॅडमिंटन हॉल दुरूस्तीचे काम सुरू आहे. ओपन जिम सुद्धा लवकरच होणार आहे.
तीन इमारतीवर साडे सोळा लाख रूपयांचे सोलारची सोय केली जाणार आहे. यापुढे क्रिडा संकूल कोणालाही सांस्कृतिक भाड्याने न देण्याचा ठराव झाला आहे. गुरूवारी सकाळी युवा नेते अरविंद पाटील व जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी स्वत: या कामाची पाहणी करून सुचना दिल्या. तालुका स्तरावर मिनी स्टेडीयम उभारण्यात येत आहेत असेही यावेळा सांगण्यात आलं. पुणे येथील बाणेवाडी क्रिडा संकूलावर हे क्रिकेट स्पीच आहे. त्या क्रिकेट स्पीचला टर्बीकेट पीच म्हणतात. महाराष्ट्रात जे कुठे नाही ते लातूरात करण्याचा पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांचा प्रयत्न आहे. तात्पर्य जे महाराष्ट्रात कोठेच नाही ते लातूरात होत आहे. मेरा देश बदल रहा मेरा लातूर भी बदल रहा है. याच प्रकारे साऊंड सिस्टीम दुरूस्तीचे काम सुरू झालेले आहे.
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा 9333333548 हा आमचा नंबर
No comments:
Post a Comment