लातूर / प्रतिनिधी
लातूर शहरासाठी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा जेथून होतो. त्या मांजरा प्रकल्पात केवळ साडेपाच टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्ल्क आहे. पावसाळा अर्धा संपत आला, आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या तुलनेत 40 टकके पावसाची नोंद झालेली असली तरी मांजरा प्रकल्पातील पाणीपातळी किंचीतही वाढ झालेली नाही. नजीकच्या काळात मोठे पाऊस झाले नाहीत तर मात्र लातूरकरांसाठी ही धोक्याची घंटा आहे. म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.
यंदाच्या मोसमात लातूर जिल्ह्यात सरासरी 40 टक्के पाऊस आज तारखेपर्यंत झाला. हा पाऊस पिकासाठी चांगला म्हणत असताना जिल्ह्यातील मोठे, मध्यम प्रकल्प कोरडेठाक आहेत. ही चिंतेची बाब आहे. लातूर जिल्ह्यातील दोन मोठे प्रकल्प, आठ मध्यम प्रकल्प आणि 132 लघु पाटबंधारे प्रकल्पात आज मितीस 114 दलघमी अर्थात 16.40 टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.
लातूरकरांची तहान भागवणाऱ्या धनेगाव ता. केज येथील मांजरा प्रकल्पाची क्षमता 224 दलघमी इतकी आहे. दि. 27 जुलै रोजी या प्रकल्पात एकू ण 56.994 दलघमी एकूण पाणीसाठा शिल्लक आहे.
त्यापैकी 47.130 दलघमी मृत पाणीसाठी असतो. त्यामुळे फक्त 9.684 दलघमी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती लातूर पाटबंधारे विभाग क्र. 1 यांच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. मागच्या दोन वर्षापासून मांजरा प्रकल्प पुर्ण क्षमतेने भरत आहे. परंतू, यंदा अर्धा पावसाळा संपत आला तरी प्रकल्पात मात्र किंचीतही वाढ झालेली नाही. येतया काही दिवसात मोठे पाऊस व्हावेत आणि मांजरा प्रकल्प तुडूंब भरावा अन्यथा पुन्हा शहरातील नागरीकांसमोर पाणीटंचाईचे शुकलकाष्ट लागण्याची भिती वर्तविली जात आहे.
लातूर जिल्ह्यातील मांजरा आणि निम्न तेरणा या दोन मोठ्या प्रकल्पात एकूण 18.03 टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. निम्न तेरणात 38.479 दलघमी उपयुक्त पाणी साठा शिल्लक आहे.
लातूर जिल्ह्यात जून, जुलै या दोन महिन्यात तालुकानिहाय झालेला पाऊस पुढीलप्रमाणे लातूर 282.10 मिमी, औसा 285.57, रेणापूर 296.75, उदगीर 278.74, अहमदपुर 284.33, चाकूर 420.00, जळकोट 225.50, निलंगा 370.09, देवणी 362.01 आणि शिरूर अनंतपाळ तालुक्यात सर्वाधित 462.99 मिमि पावसाची नोंद झाली आहे. आजच्या तारखेपर्यंत झालेला पाऊस पिकांसाठी चांगला असला तरी जिल्ह्यातील मोेठे, मध्यम, लघु पाटबंधारे प्रकल्पातील पाणीसाठ्याची उपलबध आकडेारी पाहता आजतरी डोकेदुखी वाढवणारी म्हणावी लागेल.
लातूर जिल्ह्यातील मांजरा आणि निम्न तेरणा या दोन मोठ्या प्रकल्पात एकूण 18.03 टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. निम्न तेरणात 38.479 दलघमी उपयुक्त पाणी साठा शिल्लक आहे.
तावरजा, व्हटी तिरू कोरडेठाक
लातूर जिल्ह्यातील तावरजा, व्हटी आणि तिरू मध्यम प्रकल्पात शून्य टक्के उपयुक्त साठा असून प्रकल्प कोरडे पडत आहेत. उर्वरित रेणापूर, देवर्जन, साकोळ, धरणी आणि मसलगा या पाच प्रकल्पात 28.79 टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यातील एकूण 132 लघुपाटबंधारे प्रकल्पांपैकी बहुतांश प्रकल्प कोरडेठाक असून त्यात केवळ 10 टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. लातूर जिल्ह्यात जून, जुलै या दोन महिन्यात तालुकानिहाय झालेला पाऊस पुढीलप्रमाणे लातूर 282.10 मिमी, औसा 285.57, रेणापूर 296.75, उदगीर 278.74, अहमदपुर 284.33, चाकूर 420.00, जळकोट 225.50, निलंगा 370.09, देवणी 362.01 आणि शिरूर अनंतपाळ तालुक्यात सर्वाधित 462.99 मिमि पावसाची नोंद झाली आहे. आजच्या तारखेपर्यंत झालेला पाऊस पिकांसाठी चांगला असला तरी जिल्ह्यातील मोेठे, मध्यम, लघु पाटबंधारे प्रकल्पातील पाणीसाठ्याची उपलबध आकडेारी पाहता आजतरी डोकेदुखी वाढवणारी म्हणावी लागेल.
No comments:
Post a Comment