लातूर / प्रतिनिधी
स्व. विलासरावजी देशमुख यांच्या पुर्णाकृती पुतळ्याच्या उद्घाटनासाठी लवकरच सोनिया गांधी व राहूल गांधी येणार आहेत. विकासरत्न विलासरावजी देशमुख मांजरा सहकारी साखर कारखान्यावर उभारण्यात येत असलेल्या विलासरावजी देशमुख यांच्या पुर्णाकृती पुतळा उद्घाटनासाठी कॉंग्रेस पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी व राहूल गांधी हे येत्या 25 ते 30 दिवसांत येणार आहेत.
महाराष्ट्रात दिवसेंदिवस कॉंग्रेस पक्षाची वाताहत होत आहे. आणि लातूर जिल्हा परिषद आणि महानगरपालिका, नगर पंचायत या भाजपाच्या ताब्यात आहेत. लातूर जिल्ह्यात ना. संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी इंद्रप्रस्थ जलभुमी अभियान तसेच रेल्वे बोगी प्रकल्प या माध्यमातून अभुतपूर्व शक्तीप्रदर्शन केलेले आहे. याचे उतर कॉंग्रेस देवू शकत नाही आणि अशा परिस्थितीत मांजरा शेतकरी साखर कारखान्यावर कॉंग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी व राहूल गांधी येणार आहेत. त्यांची कामे गतीने सुरू आहेत.
या निमीत्ताने कॉंग्रेसच्या पदरात काही पडतो काय याचाही प्रयत्न सुरू आहे. याचवेळा सोनिया गांधी आणि राहूल गांधी यांना लातूर शहर विधानसभा मतदार संघ हा अल्पसंख्यांक बहूल मतदार संघ असल्यामुळे अल्पसंख्यांकांना उमेदवारी मिळावी यासाठी शिष्टमंडळ भेटणार असल्याचे वृत आहे. मांजरा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकरी मेळावा, विलासराव देशमुख यांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे.
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा 9333333548 हा आमचा नंबर
No comments:
Post a Comment