साहित्य संगीत कला अकादमीचे धरणे निदर्शने अंदोलन
अहमदपूर दि.
विसाव्या शतकातील महान गायक स्वरसम्राट पद्मश्री मोहम्मद रफी साहेब यांना केंद्र सरकारने मरणोत्तर भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार बहाल करावा अशी मागणी येथील साहित्य संगीत कला अकादमीने केली आहे.
आज येथील तहसिल कार्यालयाच्या समोर अकादमीच्या वतीने धरणे व निदर्शने आंदोलन करून उपविभागीय अधिकारी प्रशांत फूलारी यांच्या मार्फत राष्ट्रपती रामानाथ कोविंद यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की,वैश्वीक क्रांती करून ज्यांनी भारत देशाला उज्वल करण्याचा प्रयत्न केला अशा महान व्यक्तींना आता पर्यंत भारत सरकारने भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार बहाल करून त्यांचा आणी त्यांच्या कार्याचा सन्मान केला आहे. हिंदी चित्रपट सृष्टीतील ख्यातनाम गायक तथा विसाव्या शतकातील सर्वोत्कृष्ट गायक स्वरसम्राट पद्मश्री मोहम्मद रफी साहेब यांनी आपल्या गीताच्या माध्यमातून प्रेम,शांती,सद्भावना व राष्ट्रीय एकात्मता वृद्धींगत करण्याचा प्रयत्न केला.या पूर्वीही सांस्कृतिक व कलेच्या क्षेत्रातील गान कोकीळा लता मंगेशकर,शहनाई वादक उस्ताद बिस्मीलाखाॅ,सूब्बालक्ष्मी यांना भारतरत्न किताब देवून सरकारने सरकारने त्यांच्या कार्याचा व कलेचा गौरव केलेला आहे.
वास्तविक मोहम्मद रफी साहेब सारखा अष्टपैलू गायक अतापर्यंत झाला नाही व भविष्यात असा गायक होईल असे वाटत नाही.ते हयात असताना हा बहुमान भारत सरकारला घेता आला नाही.तरी पद्मश्री मोहम्मद रफी यांना मरणोत्तर भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देवून त्यांच्या व त्यांच्या कलेचा गौरव करावा.
सदर निवेदनावर साहित्य संगीत कला अकादमी चे अध्यक्ष यूवकनेते डाॅ सिध्दार्थकूमार सूर्यवंशी,सय्यद याखूब,सुरेश डबीर,सामाजिक कार्यकर्ते गफारखान पठाण,राजू कांबळे,समशेर पठाण,खाजाभाई शेख,मोईन शेख,नूरमहोम्मद मूस्तफा,शेख दिलदार,जाफरभाई शेख,शाहरूख पठाण,इम्रान शेख,सय्यद एजाज आदींच्या स्वाक्ष-या आहेत.
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा हा आमचा नंबर
No comments:
Post a Comment