अजय देवगन घेऊन येत आहे ‘हेलीकॉप्टर ईला’

Saturday, July 7, 2018

मुंबई,६ 
पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकण्यास अभिनेत्री काजोल सज्ज झाली असून काजोल रिद्धी सेनसोबत ‘हेलीकॉप्टर ईला’ या आगामी चित्रपटात दिसणार आहे.
आपल्या टिवटर अकाऊंवरुन काजोलच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर अजय देवगनने शेअर केले. हेलीकॉप्टर ईला चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख पोस्टर शेअर करत जाहीर केली. अजय देवगन आणि जयंतीलाल गडा यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. आनंद गांधी यांचा बेटा कागडो या गुजराती नाटकावर हा चित्रपट आधारित आहे. तर काजोलच्या मुलीचे पात्र चित्रपटात रिद्धी सेन साकारणार आहे.

No comments:

Post a Comment