अक्षयने रिलीज केला ‘चुंबक’चा ट्रेलर !

Saturday, July 7, 2018


बॉलीवूडचा आघाडीचा सुपरस्टार अक्षय कुमारचे सादरीकरण असलेल्या ‘चुंबक’ या चित्रपटाचा ट्रेलर स्वत: अक्षय कुमारने रिलीज केला आहे. प्रख्यात गीतकार, गायक आणि अभिनेता स्वानंद किरकिरे आणि चित्रपटातील इतर कलाकार व तंत्रज्ञ यावेळी उपस्थित होते. त्यात प्रमुख भूमिकेतील संग्राम देसाई आणि साहिल जाधव, राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक संदीप मोदी, लेखक सौरभ भावे यांचा देखील समावेश होता.

अक्षय कुमार या ट्रेलरच्या रिलीजप्रसंगी चित्रपटाबद्दल बोलताना म्हणाला की, या चित्रपटात आयुष्यात कशाची निवड करायची याबद्दल भाष्य करण्यात आले आहे. आधी तुम्ही निवड घडवता आणि नंतर त्या निवडी तुम्हाला घडवतात. या अक्षयने अगदी हेतुपुरस्सर आणि चित्रपट पाहिल्यानंतर आलेल्या भावनेतून चित्रपटाची प्रस्तुती करण्याची केलेली निवड ही केलेली आहे.

No comments:

Post a Comment