बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीच्या आयुष्याची कहाणी लवकरच वेब सीरिजच्या माध्यमातून ’करनजीत कौर : द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लिओनी’मधून समोर येणार आहे. तिच्या बायोपिकचा ट्रेलर आज रिलीज झाला. रिलीजच्या काही तासातच सनीच्या बायोपिकच्या ट्रेलरला १६ लाखांहून जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. यावरुनच सनीचे चाहते तिच्या या बायोपिकची आतुरतेने वाट पाहत असल्याचं स्पष्ट होतं.
मोबाईलच्या स्टोअरेजमध्ये... एसडी कार्डमध्ये... पॉर्न साईटसवर... डेस्क टॉपवरच्या हिडन फाईल्समध्ये लपवून ठेवली जाणारी सनी... पण आता तिच्या सनी होण्याची कहाणी पडद्यावर येणार आहे.. त्या कहाणीचं नाव आहे... करनजीत कौर.
झी फाईव्हने सनी लिओनीची स्टोरी वेब सीरिजमधून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. सनी या पॉर्न इंडस्ट्रीत कशी आली आणि तिथून बॉलिवूडपर्यंतचा सगळा प्रवास या वेब सीरिजमध्ये असणार आहे.
घरची परिस्थिती... करिअरबाबतची अनिश्चितता यामुळे १९८१ साली जन्मलेली करनजीत कौर अवघ्या १७ व्या वर्षी पॉर्न इंडस्ट्रीत आली. सनीला मॉडेलिंगचा सल्ला तिच्या वर्गमैत्रिणीने दिला होता. पण तिने ज्या मॉडेलिंगसाठी ऑडिशन दिलं, ते पॉर्न मॅगझीन होतं... आणि इथेच करनजीत कौर बनली... सनी लिओनी... आणि सुरु झाला... अमाप पैशांचा ओघ...
अमेरिकेतल्या मॅगझीनसाठी न्यूड मॉडेलिंगपासून सुरु झालेला प्रवास थेट पॉर्न मूव्हीजपर्यंत पोहोचला. सनी लिओनी पॉर्न इंडस्ट्रीची जणू राणी बनली. पैसा, प्रसिद्धी अमाप होती. पण कौटुंबीक पातळीवर सनी अस्वस्थ होती. सनीच्या आयुष्यातला सर्वात मोठा टर्निंग पॉईंट होता... तो म्हणजे भारतातल्या बिग बॉसमध्ये सनीची एन्ट्री. कारण, इथेच सनीसाठी बॉलिवूडची दारं खुली झाली.
काहींनी सनीचं स्वागत केलं... काहींनी नाकं मुरडली... पण सनी आपल्या तत्वांवर लढत राहिली... तिची हीच लढाई आता जगजाहीर होणार आहे.
मोबाईलच्या स्क्रीनवर किंवा हिडन फाईल्समधली सनी हॉलमधल्या टीव्ही स्क्रीनवर कशी आली... पण हे सगळं कसं झालं... याचं उत्तर याच ट्रेलरच्या शेवटच्या वाक्यात आहे... जे सभ्यतेचा बुरखा पांघरणार्यांना उत्तर देण्यासाठी पुरेसं आहे..

No comments:
Post a Comment