पत्रकारांना पेन्शन मंजूर केल्याबद्दल आ़ ठाकूर यांचा आज सत्कार

Saturday, July 7, 2018


उस्मानाबाद : राज्यातील जेष्ठ पत्रकारांना पेन्शन योजना लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्याबद्दल भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आ़ सुजितसिंह ठाकूर यांचा सत्कार आयोजित करण्यात आला आहे़

उस्मानाबाद येथे शनिवारी (द़ि७) दुपारी १२: ३० वा़ हॉटेल समर्थ हॉलमध्ये सत्कार संपन्न होणार आहे़ भारतीय जनता पार्टी मीडिया विभाग, जिल्हा मराठी पत्रकार संघ, जिल्हा माहिती कर्यालय व जिल्ह्यातील पत्रकारांच्या वतीने आ़ ठाकूर यांचा सत्कार करण्यात येणार आहे़ ज्येष्ठ पत्रकार मोतीचंद बेदमुथा, राजाभाऊ वैद्य, विठ्ठल पाटील-भंडारवाडीकर, दिलीप पाठक- नारीकर, महादेव अप्पा नरूटे, एस़ के़ सय्यद, भाऊसाहेब भन्साळी, देविदास पाठक आदींच्या उपस्थितीत सत्कार करण्यात येणार आहे़ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा भाजप मीडिया विभागाचे जिल्हाध्यक्ष धनंजय रणदिवे यांची उपस्थिती राहणार आहे़। 

या कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन संघाचे सरचिटणीस संतोष जाधव, कोषाध्यक्ष संतोष हंबीरे, उपाध्यक्ष श्रीकांत कदम, अब्बास सय्यद, संघटक प्रशांत कावरे, मल्लीकार्जुन सोनवणे, विनोद बाकले, कैलास चौधरी, आकाश नरूटे, तालुकाध्यक्ष सुभाष कदम, अंबादास पोफळे, सुरेश घाडगे, प्रमोद कांबळे, गौतम चेडे, बालाजी वडजे, विलास मुळीक, इक्बाल मुल्ला, भाजप मीडिया विभागाचे सरचिटणीस मिलिंद कुलकर्णी, जीवन गायकवाड, पार्श्वनाथ बाळापुरे, राहुल कोरे, उपाध्यक्ष ओंकार कुलकर्णी, रामेश्वर डोंगरे, भगवान बांगर, संजय खुरूद, दत्ता गायके, राम डोंगरे, नितीन यादव, अप्पासाहेब शिंदे, चिटणीस अशोक दुबे, अनंत तापडीय, शिवाजी बोबडे, संतोष खुने, नागेश इंगळे, कोषाध्यक्ष हेमंत कुलकर्णी, सहकोषाध्यक्ष धनंजय पाडूळे, सहप्रसिध्दीप्रमुख पांडूरंग पवार, तालुकाध्यक्ष सुभाष कदम, श्रीकांत अणदूरकर, अरूण इगवे, रामनाथ बाबर, निशिकांत क्षीरसागर, दत्ता बारकूल, इक्बाल मुल्ला, तालुका प्रसिध्दीप्रमुख सुधीर पोतदार यांच्या वतीने करण्यात आले आहे़

No comments:

Post a Comment