उस्मानाबाद -
शेतक-यांच्या मेहनतीच्या पैसावर उभारलेल्या जिल्ह्यातील सहकारी साखर कारखाने, व्हिडीओकॉन, रेवॉन, जिल्हा दुध संघ, जिल्हा बँंक आदी सहकार क्षेत्र व उद्योग बुडवले गेले आहेत. यापुढे बंद पडलेले उद्योग व्यवसाय विकुन खाऊ देणार नाही. त्यासाठी उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला पर्याय म्हणून महाराष्ट्र स्टेट कॉ.ऑप बैंक लि.मुंबई या शिखर बँकेची जिल्हा शाखा जिल्हयात लवकरच चालु होईल. त्यामुळे शेतक-यांनी घाबरण्याचे कारण नाही, असे प्रतिपादन भाजपचे आमदार सुजितसिंह ठाकूर ने यांनी केले.
रूपामाता अर्बन व मल्टीस्टेट को.ऑप.के्रडीट सोसायटी मार्फत ९ हजार ५०० मे.टन क्षमतच्या रूपामाता वेअर हाऊसचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा आ.ठाकुर यांच्या हास्ते शनिवार दि.३० जून रोजी दुपारी संपन्न झाला.यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, भाजपाचे ङ्कयेष्ठ नेते मिलींद पाटील, प्रदेश कार्यकारणी सदस्य नितीन काळे, ऍड अनिल काळे, महाराष्ट्र राङ्खय वखार महामंडाळाचे वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक मिलींद घन,जिला परिषदचे माजी उपाध्यक्ष सुधाकर गुंड, जि.प.सदस्य ज्ञानदेव राजगुरू, भाजपा सरचिटणीस प्रभाकर मुळे, तालुका खरेदी-विक्री संघाचे सभापती उध्दव पाटील, जिल्हा मार्केटींग अधिकारी एम.व्ही.वाजपेयी, रूपामाता समुहाचे अध्यक्ष ऍण्ड व्यंकट गुंड उपस्थित होते
.पुढे बोलताना आ.ठाकुर यांनी मराठवाड्यातील सर्वांत मोठे वेअर हाऊस उभा केल्याबद्दल रूपामाता परिवाराचे त्यांनी अभिनंदन केले.काम करणा-यांची जनता निश्चितच दखल घेते,असे सांगुन आ.ठाकुर ने यांनी आजपर्यंत जिल्हयाङ्घया विकासाला पायाभुत सुविधा उपलब्ध करून दिल्या गेल्या नाहीत. त्यामुळे जिल्हा मागासलेला जिल्हा म्हणनू ओळखला गेला. ही ओळख पुसण्यासाठी गेल्या चार वर्षांपासून आम्ही प्रयत्न केले आहेत. जिल्हयातील सर्व तालुके राष्ट्रीय महामार्गासी जोडले गेले आहेत.कृष्णा खो-यातील कर्नाटकात वाहून जाणारे पाणी उस्मानाबाद जिल्हयाकडे वळविण्यासाठी कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पाचे जोरदार कामे चालू आहेत.जिल्हयात लवकरच ५० मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प सुरू करण्यात येईल. रस्ता, पाणी, वीज या पायाभुत सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतरच जिल्हयाचा विकास निश्तिच होणार आहे.
गेल्या १५ वर्षापासुन कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पांचे मतांङ्घया राजकारणासाठी बासनात गुंडाळून ठेवलेल्या प्रकल्पाची घोषणा कांग्रेस, राष्ट्रवादी नेत्यांद्वारे फक्त भाषणातच होत होती. परंतु प्रत्यक्षात भाजप सरकारङ्घया कारर्कीदीत पाणी उपलब्धता प्रमाणपत्र व केंद्र सरकार चे पर्यावरण प्रमाणपत्र उपलब्ध करून दिले. २०१४ साली भरलेल्या टेंडर पेक्षा संबंधित कंत्राटदाराने ३०० कोटी कमी करून काम करण्याची तयारी दाखविली आहे. प्रश्राङ्घया मुळाशी जावुन भाजप सरकार ने काम सुरू केले आहे. नसता अनेक पाटबंधारे अधिकारी जेलमध्ये गेले असते. असा दावाही आ.ठाकूर यांनी केला.यावेळी ऍण्ड मिलिंद पाटील यांनी आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी अनेक लोक बसमध्ये जागा पकडल्यासारखे दस्ती टाकुन आहेत, असे सांगुन आपले व गुंड परिवाराचे वेगळे नाते आहे. आज त्यांनी उभारलेला वेअर हाऊस म्हणजे भाजपाच्या कतृत्वाची साक्ष असल्याचे सांगितले. यावेळी नितीन काळे, सत्यवान सुरवसे, वखार महामंडाळाचे मिलींद घान, एम.व्ही.वाजपेयी यांचे ही भाषणे झाली.रूपामाता समुहाचे अध्यक्ष ऍड व्यंकट गुंड यांनी आपल्या प्रास्ताविकात शेतक-यांरया आर्थिक अडचणीचा लाभ घेणा-या इलाला पासून सुटका करण्यासाठी ९ हजार ५०० मे. टन क्षमतेचे रूपामाता वेअर हाऊस उभारले आहे. या वेअर हाऊसमुळेच जिल्हयातील शेतकर-यांचा हरभरा प्रशासन खरेदी करू शकले, असे सांगून सामान्य माणसांच्या जोरावर आमची वाटचाल सुरू असून मालतारण कर्ज यापुढे शेतक-यांना देण्यात येईल, असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मुख्यकार्यकारी अधिकारी भगिरथ जोशी व धनंजय गुंड यांनी केले. उपस्थितीताचे स्वागत ऍड.व्यंकट गुंड, सुधाकर गुंड, व्हाईस चेअरमन सुधाकर पवार, अशोक पाटील, संचालक राजाभाऊ वैद्य, शरद गुंड, बाबुराव पुजारी, सरव्यवस्थापक सत्यनारायण बोधले, विभागीय व्यवस्थापक गोपाळ जंगाले आदींने केले. कार्यक्रमास पंचायत समिती सदस्य प्रदिप शिंदे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रामदास कोळगे, विष्णुपंत धाबेकर, भाजप तालुकाध्यक्ष दत्ता सोनटक्के, शिवसेना तालुका प्रमुख सतिश सोमानी, तेरचे सरपंच महादेव खटावकर, तुळजापूर तालुकाध्यक्ष सत्यवान सुरवसे, दत्ता राजमाने आदींची उपस्थिती होती.
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा 9333333548 हा आमचा नंबर
No comments:
Post a Comment