लातूर /प्रतिनिधी: औसा नगरपालिकेने स्वच्छ भारत अभियान अंतर्गत आयोजित स्वच्छता स्पर्धेत सहभागी होत देशातून दहावा तर मराठवाड्यातून पहिला क्रमांक मिळवल्याबद्दल पालिकेच्या तत्कालीन मुख्याधिकारी वसुधा फड यांचा पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .
औसा पालिकेने स्वच्छता मोहिमेत जोरदार कामगिरी करून स्वच्छतेचा झेंडा फडकावला .ही मोहीम गतिमान करण्यासाठी पालिकेच्या तत्कालीन मुख्याधिकारी वसुधा फड यांनी प्रचंड मेहनत घेतली होती .याबद्दल पालकमंत्र्यांनी त्यांना सन्मानित केले .रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात पालकमंत्र्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला . याप्रसंगी महापौर सुरेश पवार , जिल्हाधिकारी जी श्रीकांत , महापालिकेचे आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

No comments:
Post a Comment