जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेतंर्गत 100 कोटीचे निधी मंजूर : पालकमंत्री दिलीप कांबळे

Monday, July 2, 2018

हिंगोली,दि.1: जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण अंतर्गत आतापर्यंत 70 ते 80 कोटी रुपयेपर्यंतचे अनुदान प्राप्त व्हायचे परंतू यावर्षी 2018-2019 या वर्षीच्या सर्वसाधारण योजने अंतर्गत जिल्ह्याने प्रथमच 100 कोटीचा आकडा पार केला असल्याचे राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, अल्पसंख्याक विकास व वक्फ राज्यमंत्री तथा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे म्हणाले.

जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित जिल्हा वार्षिक योजना आढावा बैठकीत पालकमंत्री श्री. कांबळे बोलत होते. यावेळी यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिवराणीताई नरवाडे, खासदार राजीव सातव, आमदार सर्वश्री डॉ. जयप्रकाश मुंदडा, तान्हाजी मुटकूळे, डॉ. संतोष टारफे, विप्लव बजौरिया, जिल्हाधिकारी अनिल भंडारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.एच. तुम्मोड, प्रभारी पोलीस अधिक्षक सचिन गुंजाळ, अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मिनीयार यांची प्रमुख उपस्थिती होती. 

श्री. कांबळे पुढे म्हणाले की, सन 2018-2019 जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत सर्वसाधारण योजन अंतर्गत जिल्ह्याला 100.75 कोटी एवढा वाढीव निधी प्रथमताच प्राप्त झाला आहे. तसेच अनुसूचित जाती योजने अंतर्गत 50.47 कोटी तर आदीवासी उपयोजना अंतर्गत 29.17 कोटी निधी जिल्ह्यास प्राप्त झाल आहे. सर्व विभागांनी जिल्हा वार्षिक योजना आराखड्यानुसार उपलब्ध होणाऱ्या निधीचे योग्य नियोजन करुन दर्जेदार व गुणवत्तापूर्ण कामासाठी वेळत खर्च करण्याबाबत दक्षता घ्यावी असे निर्देश श्री. कांबळे यांनी यावेळी दिले.

जिल्ह्यातील 2 लाख 68 हजार शेतकऱ्यांपैकी 66 हजार 330 शेतकरी हे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत पात्र झाले आहेत. सदर पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर 239 कोटी रुपयांची रक्कम जमा झाली आहे. तसेच कर्जमाफीचे प्रमाणपत्र दिलेले शेतकरी आणि उर्वरीत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात येईल असे ही पालकमंत्री श्री. कांबळे यावेळी म्हणाले. 

जिल्हा वार्षिक योजना 2017-18 च्या खर्चास मान्यता देण्यात आली. तसेच सन 2018-2019 या वर्षाचा खर्चाचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी यापूर्वीच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उपस्थित मुद्यांवर संबंधित यंत्रणेने केलेल्या अनुपालनाचा अहवाल सादर केला.

No comments:

Post a Comment