अहमदाबाद: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधू प्रल्हाद मोदी अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी अडचणीत आले आहेत. त्यांना अहमदाबाद मनपाने कारणे दाखवा नोटीस बजावली असून अनधिकृत बांधकाम थांबवण्यास सांगितले आहे.
प्रल्हाद मोदी हे त्यांच्या सार्वजनिक वितरण प्रणाली दुकानासमोर अनधिकृत बांधकाम करण्यास सुरुवात केली होती. हे बांधकामथांबवण्यासाठी त्यांना यापूर्वी दोनदा नोटीस बजावण्यात आली होती। तरीही त्यांनी अनधिकृत बांधकाम सुरूच ठेवले. त्यामुळे त्यांना तिसऱ्यांदा नोटीस बजावण्यात आली आहे.
ही तिसरी नोटीस असल्याने यानंतरही अनधिकृत बांधकाम सुरूच राहिल्यास ते पाडावे लागेल, असं पालिका अधिकाऱ्यांनी सांगितलं. 'दंड भरून हे अनधिकृत बांधकाम नियमित करण्यात आले होते. मात्र २०१५ नंतर हे बांधकाम कोणत्याही क्षणी पडण्याची भीती निर्माण झाल्याने मी पालिकेला पत्र लिहून त्यांना या बांधकामाची पाहणी करण्याची विनंती केली होती. मात्र पालिकेचा एकही अधिकारी इकडे फिरकला नाही. शेवटी हे बांधकाम पडले. त्यानंतर मी नवं बांधकाम सुरू केलं. हेच बांधकाम पालिकेनं नियमित केलं होतं. त्यांना आता अचानक जाग आली आहे नोटीस पाठवू लागले आहेत,' असा खुलासा मोदी यांनी केला आहे.
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:
Post a Comment