लातूर जिल्ह्यात उद्या मुसळधार पाऊस पडणार हो !

Friday, June 22, 2018


लातूर, दि. २२जून : भारतीय हवामान विभागाने लातूर जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात तुरळक ठिकाणी दिनांक २२ व २३ जून, २०१८ रोजी मुसळधार पावसाची तर बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याचे संकेत दिलेले आहेत. तरी लातूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना अपर जिल्हादंडाधिकारी, लातूर यांनी केल्या आहेत. 

जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्ष (दुरध्वनी ०२३८२/२२०२०४)२४ तास सुरु असून संबंधित तालुक्यातील यंत्रणांनी त्यांचे नियंत्रण कक्ष सुरु ठेवून दर तासानी पडणार्‍या पावसाबाबत तसेच काही झाल्यास त्याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाला कळवावे.

सदर कालावधीत विजा पडण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्ह्यातील सर्व शेतकरी, नागरिक यांनी खबरदारी घ्यावी. विशेषत: पाऊस होत असताना शेतीचे कामे करु नये. झाडाखाली, धातूंच्या वस्तूजवळ, विद्यूत तारा, खांबाजवळ थांबू वा आश्रय घेऊ नये. आपल्या जनावरांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करुन स्वत: सुरक्षित ठिकाणचा आसरा घ्यावा.

जलसाठ्याजवळ जाऊ नये, आपल्या मुलांना जलसाठ्यावर पोहण्यासाठी पाठवू नये. शाळा, महाविद्यालयातील शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना याबाबत सूचित करावे.पुलावरुन,नाल्यावरुन पाणी वाहत असताना कोणीही स्वत: किंवा वाहनासह पूल, नाला ओलांडण्याचा प्रयत्न करु नये.

पूर प्रवण क्षेत्रात कोणीही जाऊ नये. अशा सूचना निर्गमित करुन आपण आपल्या तालुक्यातील नदीकाठच्या गावांना सावधगिरीची सूचना देवून परिस्थितीनुरुप योग्य ती उपाययोजना करावी व तसा अनुपालन अहवाल सादर करावा. सदरच्या कालावधीत कोणीही आपले मुख्यालय सोडू नये, अशा सूचना प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या आहेत.


मराठवाडा नेता च्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment