शरीरसुखाची मागणी करणारी घटना राज्याची लक्तरे वेशीवर टांगणारी : प्रदेशाध्यक्ष चव्हाण

Saturday, June 23, 2018

कुठे नेऊन ठेवला महाराष्ट माझा हे सरकारला विचारण्याची वेळ

नांदेड : पिक कर्जासाठी शरीर सुखाची मागणी करणारी घटना म्हणजे महाराष्ट्रासाठी लज्जास्पद आहे. अशा घटना म्हणजे राज्याची लक्तरे वेशीवर टांगण्याचा प्रकार असल्याची प्रतिक्रिया कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी दिली.

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.

काल पीककर्जासाठी बँक मॅनेजरने शेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार बुलडाण्यात घडला आहे. महिलेच्या तक्रारीवरुन सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा मॅनेजर आणि शिपायाविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

कुठे नेऊन ठेवला महाराष्ट माझा हे सरकारला विचारण्याची वेळ आली आहे. या प्रकरणात केवळ गुन्हा दाखल करुन चालणार नाही, तर हा खटला जलदगती न्यायालयात चालवून संबंधित शेतकऱ्याला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी यावेळी खासदार महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली.

मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर



No comments:

Post a Comment