तुळजापूर नगराध्यक्षा अर्चना गंगणे यांचे पद रद्द – जिल्हाधिकारी गमे यांची कारवाई

Friday, June 22, 2018


सतिश महामुनी 
तुळजापुर दि २२ वार्ताहर

तुळजापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा अर्चना विनोद गंगणे यांचे नगराध्यक्ष पद उस्मानाबाद जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी अपात्र ठरविले आहे . नगराध्यक्षा गंगणे या १ कोटी ६१ लाख रुपयांच्या तुळजाभवानी यात्रा अनुदान घोटाळ्यासह घरकुल घोटाळ्यात मुख्य आरोपी होत्या . त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या ६ महिन्यापेक्षा अधिक काळ गैरहजर होत्या . या कारणाने त्यांचे पद जिल्हाधिकारी यांनी रद्द केले . याप्रकरणी समाजसेवक राजाभाऊ माने यांनी घोटाळा उघड करीत पद रद्द करण्याची तक्रार दिली होती . गंगणे या राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष असून त्यांचे पद रद्द झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे 
तुळजाभवानी यात्रा अनुदान व घरकुल घोटाळ्यामुळे ही कारवाई जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी ही कारवाई केली अाहे. या कारवाईची वार्ता सायंकाळी समजली तेव्हा तुळजापुरात खळबळ उडाली. सत्ताधारी राष्टवादी काॅग्रेसला हादरा बसला अाहे. शहरकत चर्चेला उधाण अाले असुन समाजसेवक राजाभाऊ माने याच्या तक्रारीनंतर ही कारवाई झाली अाहे. नगराध्यक्षा सौ. अर्चना विनोद गंगणे या यानतर कोणते पाऊल उचलणार याकडे सर्वाचे लक्ष अाहे.

मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment