मुखेड येथे जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा

Friday, June 22, 2018

आर्ट ऑफ लिव्हिग परिवार, पतंजली योग समिती व गणाचार्य मठ संस्थान यांचा पुढाकार 


मुखेड दि. 
जागतिक योग दिनानिमित्य येथील आर्ट ऑफ लिव्हिग परिवार, पतंजली योग समिती व गणाचार्य मठ संस्थानच्या वतीने आयोजित केलेल्या एक दिवसीय योग शिबिर येथील चौधरी फंक्शन हॉल येथे मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या शिबिरात सहभाग घेतला होता. 
जागतिक योग दिनानिमित्य आर्ट ऑफ लिव्हिग परिवार, पतंजली योग समिती व गणाचार्य मठ संस्थानच्या वतीने आयोजित केलेल्या या एक दिवसीय शिबिरात योगगुरू वीरभद्र महाराज, गणेश टेंबुर्णे यांनी वार्मअप, प्राणायाम, ध्यान, सूर्यनमस्कार, अनुलोमविलोम, पद्मसाधना, भस्त्रिका आदी विषयी शहरातील नागरिकांना सखोल मार्गदर्शन करून दररोज नित्यनियमाने हे सर्व करण्यास सांगितले. यावेळी शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये सुप्रभात मित्र मंडळ, रोटरी क्लब, वासवी क्लब, मानवता विचार मंच, संजीवनी सकाळ मित्र समूह, वैद्यकीय संस्था आदी संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता 

या शिबिरात गणाचार्य मठ संस्थांचे विरुपाक्ष शिवाचार्य महाराज, मुखेड भूषण डॉ. दिलीप पुंडे, खुशाल पाटील उमरदरीकर, नामदेव पाटील जाहूरकर, सत्यवान गरुडकर, सं. सं. सं. मस्कले, अशोक पाम्पटवार, गोविंद नारखेडे, महावीर शिवपुजे, विलास पाटील उमरदरीकर, डॉ. प्रीतम कोडगिरे, लक्ष्मण पत्तेवार, शिवाजी राठोड, यज्ञेश्वर जोशी, मारोतीमामा कार्लेकर, मारोती मामिलवाड, भागवत पावडे, अशोक वावधाने, नरसिंग सोनटक्के, शेखर पाटील, संतोष स्वामी, राजेश बेळीकर, गंगाधर पाटील, बस्वराज नीरने, गोविंद नारलावार, नामदेव सूर्यवंशी, पांडुरंग दिनकर, शिवाजी चव्हाण, नंदकुमार काचावार, सचिन रामदिनवार, सुरेश उत्तरवार, अशोक तलवारे, सुभाष दिग्रसकर, बालाजी तलवारे, उत्तम कोडगिरे, राजेश पालावार, सचिन देबडवार, विजयाताई वावधाने, भाग्यश्री साधू, संगीता टेंबुर्णे, जयश्री सोनटक्के, शारदा पाटील, आदींसह शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment