लातूर दि: 21: लातूर जिल्हा माहेारी सभा व समाजाच्या वतीने गुरुवारी महेश नवमी उत्सव मंगलमय वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्त भव्य शोभा यात्रा काढण्यात आली.
मार्केट यार्डातील गौरी शंकराचे दर्शन करुन शोभायात्रेस प्रारंभ करण्यात आला. अश्वाच्या रथातून महेशांच्या प्रतीमेची व चांदीच्या मूर्तीची शोभायात्रा काढण्यात आली. या शोभा यात्रेतील अश्व, उंट व महेश-पार्वतीच्या वेशातील मुलींनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शोभायात्रेच्या मार्गावर भव्य कमानी उभारण्यात आल्या होत्या. ही यात्रा गुळमार्केट चौक, हनुमान चौक, खडक हनुमान, पापविनाश मार्गे श्री व्यंकटेश बालाजी मंदीर येथे आली.
या शोभा यात्रेत ढोलपथक, बॅंडबाजा विविध झाकियाचा समावेश होता. बालाजी मंदीर येथे महेश पूजन व महेश वंदना पार पडली. यावेळी सर्वांना प्रसादाचे वितरण करण्यात आले. या शोभा यात्रेत लातूर जिल्हा माहेारी सभेचे अध्यक्ष राजकुमार पल्लोड, सचिव सत्यनारायण हेड्डा, कोषाध्यक्ष फुलचंद काबरा, संघटन मंत्री ओमप्रकाश सारडा, संतोष गिल्डा, अखिल भारतीय माहेारी सभेचे सदस्य बालकिशन मुंदडा, प्रदिप धूत, डॉ.रामप्रसाद लखोटिया, विभा गिल्डा, ईार बाहेती, प्रेमकिशोर मुंदडा, विशाल काबरा, संतोष अट्टल, श्रीकांत चांडक, महेश बिदादा, भारतलाल धूत, राजेशकुमार मंत्री, राजकुमार सोनी, ईार चांडक, किरण मंत्री, अर्चना मालू, अनुराधा कर्वा, गोकूल चांडक, प्रा.दिपक बजाज, किशोर भराडिया, दिलीप सोमाणी, विष्णूदास बंग, जगदीश हेड्डा, गोविंद कोठारी, गणेश हेड्डा यांच्यासह भगीनी व समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा 9333333548 हा आमचा नंबर
No comments:
Post a Comment