मुंबई : प्रतिनिधी
एसटी महामंडळाच्या ७० व्या वर्धापनदिनानिमित्त परिवहन मंत्री आणि महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी कर्मचार्यांवर घोषणांचा अक्षरशः पाऊस पाडला. शिवाय वेतन करारात दुपटीने वाढ करत असल्याचं त्यांनी जाहीर केलं.
एसटी कर्मचार्यांचा वेतन करार अनेक कारणांनी रखडला असल्याचं सांगत, आतापर्यंत झालेल्या सर्व वेतन करारांपैकी दुप्पट वाढ देणार असल्याचं रावते म्हणाले.शिवशाहीचं सरकार असताना १९९६ ला ७२ कोटींचा करार केला. सगळ्याच सरकारच्या कार्यकाळात दोन वर्षांपर्यंत करार रखडले. तरीही याच सरकारवर टीका करण्यात आली. पाप कुणाचं अन् ताप कुणाला अशी माझी अवस्था झाली असल्याचंही रावते म्हणाले.२०१२ ते २०१६ या काळात १२४० कोटींचा करार होता. २०१६ ते २०२० सालापर्यंत ४८४९ कोटींचा करार करण्याचा निर्णय घेत असल्याचं रावतेंनी जाहीर केलं.सातव्या वेतन आयोगाचं सूत्र वापरून २.५७ नुसार वेतनवाढ केली आहे. या वेतनवाढ कराराचा ४७ हजार ते ५० हजार कर्मचार्यांना फायदा होईल. यासाठी १७६ कोटी रुपयांचा भार महामंडळ स्वीकारत आहे, अशी माहिती रावतेंनी दिली.

No comments:
Post a Comment