पवार आणि गडकरींच्या गुप्त भेटीने चर्चेला उधाण

Saturday, June 2, 2018
पुणे: भाजपा आणि शिवसेनेतील कटू संबंधामुळे निर्माण झालेल्या राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी पुण्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. पुण्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बंद दाराआड या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल अर्धा तास चर्चा झाली. त्यामुळे राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.पुणे दौर्‍यावर आलेले गडकरी यांनी दुपारी पत्रकारांशी संवाद साधला. त्यानंतर पवार आणि गडकरी यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. यावेळी सहकारमंत्री सुभाष देशमुखही उपस्थित होते. या बैठकीमध्ये पुरंदर विमानतळाला जोडण्यासाठी रेल्वे मार्ग तयार करण्यात यावी, अशी मागणी पवार यांनी केल्याचे सांगण्यात आले. याशिवाय, आळंदी व देहू येथून जुलैमध्ये सुरु होणार्‍या वारीच्या मार्गाच्या डागडुजीबद्दल चर्चा करण्यात आली. मात्र, सर्वांना उत्सुकता असलेल्या दोन्ही नेत्यांमधील राजकीय चर्चेचा तपशील माध्यमांना पुरवण्यात आला नाही.

No comments:

Post a Comment