मुंबई: पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्य जनता होरपळली असताना आता सिलेंडरच्या दरांमध्येही वाढ झाली आहे. विनाअनुदानित सिलेंडरचा दर २ रुपये ३४ पैसे, तर अनुदानित सिलेंडरचा दर ४८ रुपयांनी वधारला आहे.
देशातील ८१ टक्के कुटुंबं सिलेंडरचा वापर करतात. त्यामुळे या दरवाढीचा फटका कोट्यवधी लोकांना बसणार आहे. सिलेंडरच्या दरात झालेल्या वाढीमुळे आता अनुदानित सिलेंडरसाठी मुंबईत ४९१.३१ रुपये मोजावे लागतील. तर दिल्लीत अनुदानितसिलेंडरची किंमत ४९३.५५ रुपये इतकी होईल.

No comments:
Post a Comment