तुळजापूर दि 29 डाॅ.सतीष महामुनी
जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषात महाराश्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानीच्या पावन नगरीत सकल मराठा समाज क्रांती मोर्चाच्या वतीने विराट रॅली काढण्यात आली. सकल मराठा समाजाचे ठिकठिकाणचे पदाधिकारी व भगव्या टोप्या घालून मी मराठा... एक मराठा... लाख मराठा... अशा घोषणांनी तुळजापूर नगरीत दुमदुमून निघाली.
सकाळी दहा वाजल्यापासून तुळजापूरातील सर्व मराठा तरुण शिवाजी महाराज चैकात आले. शिवाजी महाराजांच्या साक्षीने मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी या तरुणांनी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी घोषणाबाजी केली. आमदार मधुकरराव चव्हाण यांनी शिवाजी महाराज चौकातील तरुणांशी संवाद साधला, क्रांती मोर्चाचे राज्यसमन्वयक आबासाहेब पाटील यांची भेट घेतली. मराठा आरक्षणाबाबत नारायणराणे समितीच्या कामकाजात आपला सहभाग होता व माझा या मागणीला पुर्ण पाठिंबा असल्याची प्रतिक्रिया दिली. काँग्रेस जिल्हा अध्यक्ष अप्पासाहेब पाटील, सचिन पाटील , सुनील रोचकरी, माजी जी.प.अध्यक्ष धीरज पाटील यांची यावेळी उपस्थिती होती
राश्ट्रवादी काॅग्रेसच्या वतीने तुळजापूरातील चमन बागेसमोर रॅलीतील तरुणांना चहा व पाणी वितरीत करण्यात आले. जिल्हा परिषद उपाध्यक्षा अर्चना पाटील, तुळजापूरच्या नगराध्यक्षा अर्चना गंगणे, प्रभारी नगराध्यक्ष बापुसाहेब कने, राश्टवादीचे नेते विनोद गंगणे, राज्य उपाध्यक्ष गोकुळ शिदे, अविनाश गंगणे, अष्विनी रोचकरी, विषाल रोचकरी,नारायण नन्नवरे,औंदुबर कदम, अमर हंगरगेकर, संजय परमेष्वर, आनंद रोचकरी यांच्या हस्ते हजारो तरुणांना वितरण करण्यात आले.
मुस्लीम समाजाच्या वतीने रॅलीतील तरुणांना पीण्याच्या पाण्याची पाकीटे देण्यात आली तेथे आमदार चव्हाण हस्ते पाणी वितरीत करण्यात आले. हजीज जावेद, अफसर शेख, रसूल बागवान, फेरोज पठाण, आरिफ बागवान, तौफिक शेख, गौस शेख, युसूफ शेख, मौसीन खान, लाला तांबोळी अषपाक शेख या मुस्लीम नेत्यांची उपस्थिती होती.
रॅलीत मोठया संख्येने महिलांचा सहभाग होता यामध्ये भाजपाच्या जिल्हा उपाध्यक्षा मीना सोमाजी, किरण निंबाळकर, सुचित्रा वाघमारे यांच्यासह शेकडो महिलांनी भगव्या साडया परिधान करुन उत्साहाने रॅलीत सहभाग नोंदविला. राश्ट्रवादीचे नेते महेष चोपदार यंानी मराठा समाजाला राज्य शासनाने अंत न पाहता आरक्षणाची घोशणा करावी अशी मागणी केली. नगरसेवक अविनाश गंगणे यांनी याबाबत बोलताना सांगितले की, आरक्षण देण्यासाठी जो विलंब होत आहे ती बाब गंभीर आहे. खरेदी विक्री संघाचे चेअमरमन शिवाजी बोधले यांनी सांगताना मराठा समाजाला आरक्षणाची मोठी गरज आहे गरीब माणसाला आधार देण्यासाठी ही मागणी शासनाने तातडीने पुर्ण करावी अशी भावना पत्रकारांशी बोलताना सांगितले.
तुळजापूरातील जागरण गोंधळामुळे राज्य सरकार खडबडून जागे होईल असा मला विश्वास आहे अशी प्रतिक्रिया तुळजाभवानी पुजारी मंडळाचे अध्यक्ष सज्जन साळूके यांनी दिली तर आरक्षणाचा विषय मराठा समाजातील गरीब कुमकुवत घटकाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मोलाची भूमिका बजावणार आहे अषी प्रतिक्रिया तुळजाभवानी भोपे मंडळ अध्यक्ष अमरराजे परमेष्वर यांनी दिली.
स्थानिक संयोजक किशोर पवार यांनी हा जागरण गोंधळ म्हणजे सरकारला इषारा आहे असे सांगितले. मोठया संख्येने मराठा आरक्षणासाठीच्या घोंशणानि तुळजापूर नगरी दुमदुमून निघाली आहे. भगव्या टोप्या व भगवे वेषभूशेने सारे तुळजापूर भगवे बनले आहे. शिवाजी महराजांचा जयजयकार व शासनाला इषारा देणाऱ्या घोषणांनी वातावरण आरक्षणमय झालेले आहे.
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:
Post a Comment