नव्या सभापतीपदासाठी असोले तर उपसभापतीसाठी गोरे चर्चेत
हिंगोली / प्रतिनिधी
सत्तेच्या वाटाघाटीत तालुक्याच्या विक ासाला खिळ बसली तरी याच कोणाला घेणे देणे राहिले नसल्याचे चित्र हिंगोलीच्या राजकारणात दिसून येतं. ठरल्याप्रमाणे सव्वा वर्षाचा कार्यकाळ संपल्याने शिवसेनेचे हिंगोली पंचायत समिती सभापती विलास काठमोडे व कॉंग्रेसच्या उपसभापती कावेरी कऱ्हाळे यांनी 29 जून रोजी राजीनामा दिला आहे. लवकरच सभापती, उपसभापती यांची निवड केली जाणार असून सभापती पदासाठी कॉंग्रेसच्या वतीने पंडीत असोले व मिना असोले यांचे नाव चर्चेत आहे. तर उपसभापती पदासाठी मुक्ता संतोष गोरे यांचे नाव पुढे येत आहे.
हिंगोली पंचायत समितीत कोणत्याही एका पक्षाला बहुमत न मिळाल्याने शिवसेना-कॉंग्रेसने एकत्र येत पंचायत समितीत सत्ता काबीज केली. यामध्ये ठरल्याप्रमाणे सव्वा वर्ष सभापती पद शिवसेनेच्या वाट्याला आले हा सव्वा वर्षाचा कार्यकाळ शिवसेनेच्या वतीने विलास काठमोडे यांनी सांभाळला तर उपसभापती पद कॉंगे्रसच्या कावेरी कऱ्हाळे यांच्याकडे होते. सभापती काठमोडे यांनी आपल्या सव्वा वर्षाच्या काळात पंचायत समितीमध्ये एका शौचालयाचे केलेले काम सोडले तर उल्लेख करावा असे कोणतेही महत्वाचे काम केले नाही. या सव्वा वर्षाच्या काळातही त्यांच्या दालनाचे काम सुरू असल्याने त्यांना सभापती असतानाही सहा महिने खुर्चीपासून अलिप्तच रहावे लागले होते. आता या राजीनामा सत्रानंतर सभापती पद कॉग्रेसच्या वाट्याला येणार आहे
. हे पद एस.टी.आरक्षित असल्याने सभापतीपदासाठी पंचायत समिती सदस्य पंडीत असोले व मिना असोले यांचे नावे चर्चेत आहे. तर शिवसेनेच्या वतीने उपसभापतीपदासाठी पंचायत समिती सदस्या मुक्ता संतोष गोरे व भुजंग भगत यांचे नाव चर्चेत आहे. येथील पक्षीय बलाबल शिवसेना-8, कॉंग्रेस 6, राष्ट्रवादी कॉंग्रेस1, भाजपा 3, रासपा 1 व अपक्ष 1 असे आहे.
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:
Post a Comment