थोडा संयम राखा राम मंदिर होणार : योगी

Monday, June 25, 2018

अयोध्या :
प्रभू श्री रामचंद्रांची कृपादृष्टी झाल्यास लवकरच अयोध्येत राम मंदिर उभे राहील. त्यासाठी काही दिवस आपण सगळ्यांनीच संयम बाळगण्याची गरज आहे, प्रभु श्री राम हे मर्यादा पुरषोत्तम होते संत हे त्यांचे प्रतिनिधि आहेत त्यानी थोडा सयम बाळगावा  असे आवाहन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज संत-महंताच्या संमेलनात केले. 

मुख्यमंत्री आदित्यनाथ नाथ योगी नि आपल्या ३० मिनिट च्या भाषणात ते म्हणाले कि आज  १९२ देशात योगा ला स्वीकारले आहे येणाऱ्या कुंभ मेळ्यात १९२ देशाचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत  राम राज्याची स्थापना भाषणे करून होणार नाहीत तर त्या साठी मजबूत माणूस म्हणून काम करावे लागेल . देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या उपक्रमाची गंभीरतेने दखल घेतली आहे 

महंत नृत्यगोपाल दास यांच्या वाढदिवसानिमित्त हे संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या योगींनी राम मंदिराचा प्रश्न  नक्कीच सुटेल, फक्त त्यासाठी सर्वांनी थोडासा संयम दाखवण्याची गरज आहे, असे आवाहन केले. हा प्रश्न घटनेच्या चौकटीत राहूनच सोडवावा लागणार आहे, असेही योगींनी नमूद केले.  ज्यांनी रामभक्तांवर गोळ्या झाडल्या तेच लोक आज राम मंदिराबाबत बोलू लागल्याचे सांगत योगींनी विरोधी पक्षांवरही निशाणा साधला.

मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment