3 कोटी 10 लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ : ना. धनंजय मुंडें

Tuesday, June 26, 2018

ना. धनंजय मुंडेंचा गुरूवार पासून चार दिवसांचा परळी तालुक्याचा झंझावती दौरा


परळी दि. 26....................... विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे गुरूवार दि.28 जून पासून परळी विधानसभा मतदार संघातील परळी तालुक्यतील गावांचा चार दिवसांचा झंझावती दौरा करणार आहेत. या दौर्‍यात ते 3 कोटी 10 लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांचा या गावांमध्ये शुभारंभ करणार असून, चार दिवसात ते 23 गावे पिंजुन काढणार आहेत. 

गुरूवार दिनांक 28 जून रोजी सकाळी 8 वाजता कौठळी, 9 वाजता संगम, 10 वाजता दाऊतपूर, सायं 06 वाजता लमाणतांडा परळी, सायं 07 वाजता कासारवाडी, रात्रौ 08 वाजता सारडगांव येथील विकास कामांचा शुभारंभ करणार आहेत. शुक्रवार दिनांक 29 जून रोजी सकाळी 08 वाजता पोहनेर, सकाळी 09 वाजता बोरखेड, सकाळी 11 वाजता परळी वैजनाथ येथे आयोजित पुरस्कार वितरण समारंभास उपस्थिती त्यानंतर सायं 06 वाजता सेलू, सायं 07 वाजता कौडगांव हुडा, रात्रौ 08 वाजता आचार्य टाकळी, रात्रौ 09 वाजता पिंपरी बु. येथील गावांमधील विकास कामांचा शुभारंभ करणार आहेत. दौर्‍याच्या तिसर्‍या दिवशी म्हणजेच शनिवार दिनांक 30 जून रोजी सकाळी 08 वाजता नंदागौळ, सकाळी 09 वाजता लेंडेवाडी, सकाळी 10 वाजता दौनापूर, सकाळी 11 वाजता माळहिवरा, सायं 05 वाजता बोधेगांव, सायं 06 वाजता नागपिंपरी तर रात्रौ 08 वाजता नागापूर येथील गावांमध्ये विकास कामांच्या शुभारंभासाठी जाणार आहेत. चौथ्या आणि शेवटच्या दिवशी सकाळी 11 वाजता परळी शहर राष्ट्रवादी काँग्रेसची जगमित्र कार्यालयात होणारी बैठक आटोपून सायं 06 वाजता मलनाथपूर, सायं 07 वाजता वागबेट तर रात्रौ 08 वाजता धर्मापूरी येथील कार्यक्रमास उपस्थित राहतील.

उपरोक्त गावांमध्ये 2515 योजनेंतर्गत गावांतर्गत सिमेंट रस्ता, स्मशानभूमी, रस्ता काँक्रीटीकरण, सामाजिक सभागृह, पेव्हर ब्लॉकचे रस्ते, ग्रामपंचायती इमारत, नाली बांधकाम, गावांतर्गत नाल्यास संरक्षण भिंत, व्यायाम शाळा, शाळेस संरक्षण भिंत, मुस्लिम समाजासाठी कब्रस्तान, दहनभूमी आदी कामे करण्यात येणार आहेत. ना.धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नांमुळे शासनाने ग्रामपंचायतीला विकास निधी मंजुर केल्यानंतरही ग्रामविकास विभागाने ही कामे ग्रामपंचयतींना न मिळू देता ती सार्वजनिक बांधकाम विभागाला वर्ग करण्याचा डाव रचला होता, मात्र न्यायालयाने चपराक दिल्यामुळे पुन्हा हा निधी ग्रामपंचायतीला वर्ग झाला असल्यामुळे या विकास कामांच्या उद्घाटनाला महत्व प्राप्त झाले आहे. 

या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुक्यातील सर्व पदाधिकारी, पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य, मार्केट कमिटीचे सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं. सदस्य, विविध सोसायट्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची माहिती पक्ष कार्यालयातून देण्यात आली. विरोधी पक्षात असतानाही ना.मुंडे यांच्या प्रयत्नांमुळे तालुक्याला कोट्यावधी रूपयांचा विकास निधी मिळत असल्याने गावकर्‍यांमध्येही या विकास कामांमुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, या कार्यक्रमास मोठ्या संख्येने गावकर्‍यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment